Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

खैराची बेकायदेशीर वाहतूक करणारी दोन वाहने जप्त

खैराची बेकायदेशीर वाहतूक करणारी दोन वाहने जप्त

रोहा वन विभागाने केली कारवाई

 महाराष्ट्र मिरर वृत्त-रोहा

 माणगाव तालुक्यातील मौजे विघवली फाटा मुंबई-गोवा महामार्गावर मोरया धाब्याजवळ खैर सोलीव लाकूड वाहतूक करीत असताना (शुक्रवार, दि.27 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 5.10 वाजण्याच्या सुमारास) रोहा वनविभागाच्या पथकाने कारवाई केली. यात ट्रक टेम्पो आणि लाकूड असे 5 लाख 78 हजार 904 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी श्री.उमेश जयसिंग ढवळे रा. बारामती वडगांव निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती रोहा वन विभागाचे उप वनसंरक्षक अप्पासाहेब निकत यांनी दिली आहे.

      याबाबत उपवनसंरक्षक व महावनसंरक्षक रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली फिरते पथक रोहा यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून शुक्रवारी, दि.27 ऑगस्ट 2021 रोजी मौजे विघवली फाटा येथे उभा असलेला ट्रक क्रमांक MH 16/Q7151 तपासला असता त्यामध्ये खैर सोलीव लाकडे विनापरवाना आढळून आली तसेच आजूबाजूला तपास केला असता MH 06/BG0089 या क्रमांकाचा टाटा एस टेंपो उभा असलेला दिसून आला. हा टेम्पो तपासला असता त्यात खैर सोलीव लाकडे सापडली. संबंधित वाहनांवर वनविभागाच्या पथकाने कारवाई करीत माणगाव नाणोरे विक्री आगारावर दोन्ही वाहने मालासह जप्त केली. 

     ही कारवाई रोहा वन विभागाचे उपवनसंरक्षक अप्पासाहेब निकत, सहा वनसंरक्षक रोहा विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल फिरते पथक ईच्छांत कांबळी, वनक्षेत्रपाल माणगाव पी.पी.आर.पाटील, वनरक्षक अजिंक्य कदम, वनरक्षक तेजस नरे, वनरक्षक योगेश देशमुख यांनी पार पाडली असून पुढील तपास सुरु आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies