Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

साहेब... मी पण फोडू का नारळ ?

 साहेब... मी पण फोडू का नारळ ?

जयंतरावांनी पूर्ण केली ६ वर्षीय लहानग्या संचितची इच्छा

सुधीर पाटील-सांगली


साहेब... मी पण फोडू का नारळ ? लहानग्या संचितचे निरागस बोल ऐकून जयंतराव पाटलांनी लागलीच त्याची नारळ फोडून शुभारंभ करण्याची इच्छा पूर्ण केली.

बर्‍याचदा आपल्या कृतींच्या माध्यमातून राजकीय नेते लोकांची मने जिंकत असतात. आज राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनीही आपल्या अशाच एका कृतीच्या माध्यमातून वाळवाकरांची मने जिंकली आहे.

आज सकाळीच वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी ते बावची रस्ता, आष्टा- दुधगाव रस्ता, बागणी - ढवळी - बहादूरवाडी रस्ता, ढवळी ते कोरेगांव दरम्यान दोन लहान पुल, नागाव - भडखंबे - बहादूरवाडी फाटा रस्ता या विविध कामांचे शुभारंभ करण्यात आले.

वाळवा तालुक्यातील भडखंबे येथे कार्यक्रम सुरू असताना ६ वर्षीय संचित गावडेही त्यावेळी तिथे उपस्थित होता. आपल्या गावातील मोठी मंडळी नारळ फोडतानाचे चित्र पाहून लहानग्या संचितलाही याचे मोठे कुतूहल वाटले. मोठी हिम्मत करुन करून संचितने नारळ फोडण्याची इच्छा मंत्री जयंतरावांकडे व्यक्त केली. 

दरम्यान मंत्री जयंतरावांनी कालपासून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात दोन दिवसात तब्बल ४१ कोटी रुपयांचा विकास कामांचा शुभारंभ करत धडाका लावला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies