Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

जीवरक्षक फाऊंडेशनच्या माध्यमातून गणेश विसर्जन व इतर कार्यक्रमासाठी गेली २५ वर्षे मोफत सेवा

 जीवरक्षक फाऊंडेशनच्या माध्यमातून गणेश विसर्जन व इतर कार्यक्रमासाठी गेली २५ वर्षे मोफत सेवा

महेश कदम-मुंबई


जलजीव रक्षक ही अधिकृत संघटना असून या मधील सदस्य गेली २५ वर्ष पासुन अधिक वर्षे मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेच्या (R.T.O.) विद्यमानाने आणि मुंबई पोलीस, बृहन्मुंबई महानगरपालिके बरोबर सर्तक सहकार्य करत आहे. हि संस्था, जनहितारत, स्वयंसेवी करणारी असून, श्री गणेशमुर्ती विसर्जन (गणेशोत्सव), देवी विसर्जन (दसरा), महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन (६ डिसेंबर), नववर्ष स्वागत (३१ डिसेंबर), बडी रात व रमजान ईद साठी हाजी अली दर्गाह इत्यादी आणि इतर अत्यावश्यक प्रसंगी  मुंबईतील सर्व समुद्रकिनारी वर नमूद केलेल्या सण आणि उत्सवासाठी विनामूल्य सेवा देत आहेत. 

जलजीव रक्षकच्या ताफ्यात ६०० हुन अधिक अधिकृत जलजीव सुरक्षा रक्षक आणि सभासद आहेत. हे सर्व सुरक्षा रक्षक आपल्या जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या जबाबदारीवर १४-१६ तास समुद्राच्या पाण्यात उभे राहुन आलेल्या भाविकांना, सामान्य जनसमुदायाच्या सुरक्षिततेकरिता आणि समुद्राच्या पाण्यात बुडण्याचा विवीध दुर्घटना टाळण्या साठी कार्यरत असतात.

कोविड १९ च्या या पॅडेंमिक काळात मुंबईतील विविध चौपाट्यांवर घरगुती व सार्वजनिक गणपतींच्या मुर्तींचे विसर्जन करण्यास निर्बंध असताना, जल जीव रक्षक फाऊंडेशनचे संजय मिश्रा,(अध्यक्ष), राजकुमार भाटिया (खजिनदार) संदिप शिवतरकर (सरचिटणीस), आनंद रायमाने आणि सुशांत कवळेकर (PRO) यांच्या नेतृत्वाखाली, गिरगाव, वरळी, नारळीबाग, किर्ती कॉलेज, सी ५ शिवाजी पार्क, शिवडी, जुहू आणि लोणावळा या ठिकाणी जल जीवरक्षकचे सुमारे ३५० जीवरक्षक सर्व नागरिकांना गणेशमूर्ती विसर्जनाची मोफत सुविधा देत आहेत. ह्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद असुन अनेक मान्यवर सुद्धा उपस्थित रहातात. 

सदर सेवा देण्यासाठी वाहतूक नियंत्रक शाखा, मुंबई पोलीस, मुंबई पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे आम्हाला मोलाचे सहकार्य लाभते ही सेवासुविधा १½ दिवसांचे, ५ दिवसांचे, ७ दिवसांचे आणि १० दिवसांचे गणपती यांच्या विसर्जनावेळी आयोजित करण्यात आलेले आहे. 

जल जीवरक्षक फाऊंडेशन माध्यमातून ही सेवा मुंबईसाठी गेली २५ वर्षे मोफत राबवण्यात येत आहे. अशा प्रकारे ही संस्था लोकांच्या सेवेसाठी मनापासून काम करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies