शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश
महाराष्ट्र मिरर टीम-कर्जत
कर्जत तालुक्यातील ओलमन आणि नांदगाव येथील राष्ट्रवादी आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकत्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत आज शिवसेनेत प्रवेश केला असून या पट्ट्यात शिवसेना वाढीस चालना मिळाली आहे असं बोलल जातं.
पंचायत समिती माजी सदस्य चित्रा मनोहर कारोटे,कार्यकर्ते लहू पुनाजी कारटे,प्रकाश मनोहर अगिवले,ज्ञानदेव वामन दिघे, शब्बीर इस्माईल भातबर्डे ,काशिनाथ रामचंद्र झुगरे ,जयेश रघुनाथ शिंगोळे ,संजय भाऊ कराळे ,आशा शंकर जोशी ,काळुबाई नामदेव दिघे ,साधना विठ्ठल मुंडे, विश्वास बाळू वाडेकर ,विठ्ठल भवारी ,रोहिणी पुंडलिक जोशी, सचिन लक्ष्मण कानडे ,दीपक काळु शिंद , दुर्गेश नामदेव फोपे,अरुण काळूराम कारोटे, अंकुश मारूती चिमटे आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या कार्यकर्त्यांमुळे नांदगाव व ओलमण ग्रामपंचायत मधील कार्यकर्त्यां मध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पुढील शिवसेना संघटना वाढीसाठी यांचा निश्चितच फायदा होणार असल्याच्या भावना उपस्थितांमध्ये व्यक्त होत्या.
याप्रसंगी तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, उपतालुका प्रमुख भारत डोंगरे, उत्तम शेळके, विभाग प्रमुख रवी ऐनकर, नागेश साबळे, शत्रुघ्न शिंगोळे तसेच अनेक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते...