Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

जो पक्ष काम करतो त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे:-जिल्हापरिषद सदस्या चित्रा पाटील यांचे कुर्डुस येथे प्रतिपादन

 जो पक्ष काम करतो त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे:-जिल्हापरिषद सदस्या चित्रा पाटील यांचे कुर्डुस येथे प्रतिपादन

  अमूलकुमार जैन-अलिबाग                  


तळागाळातील सर्वसामान्य जनतेसाठी जो पक्ष कार्य करीत आहे त्याच्या पाठीशी समाज अथवा ग्रामस्थ ठामपणे उभे राहिले तर समाजाचा गावाचा विकास हा शंभर टक्के होईल यात शंका नाही आहे असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या चित्रा पाटील यांची कुर्डुस विभागात कामाच्या वचनपूर्ती आणि काही विकास कामे यांच्या भूमिपूजन कार्यक्रमात केले.

 यावेळी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील,माजी आमदार पंडित पाटील,कुर्डुस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामभाऊ कर्वे,संदीप पाटील, ग्राम पंचायत सदस्या वनिता,शेळके,सारिका नाईक,जनार्दन लेंडी,संगीता नाईक सहित कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जसजसा निवडणूक जवळ येत जाते तसतसे हौशी लोकप्रतिनिधी यांचा प्रादुर्भाव हा वाढत जातो.सन2010 मध्ये मी ग्रामपंचायत सदस्य असताना 2012 पासून आजपर्यंत जिल्हा परिषद सदस्या म्हणून काम करीत असताना जिल्हापरिषदेच्या माध्यमातून जनहीताची कामे करण्याची संधी मिळाली.पक्षाने मला घडविले आहे.पक्ष वाढीसाठी तळागाळातील जनेतची कामे  गरजेचे आहेत असेही चित्रा पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies