Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

खोपोली कॉग्रेससह खालापूर कॉग्रेसने केला भाजपा सरकारचा निषेध

खोपोली कॉग्रेससह खालापूर कॉग्रेसने केला भाजपा सरकारचा निषेध

दत्ता शेडगे-खोपोली


भारतीय राष्ट्रीय कॉगेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या आदेशानुसार वाढत्या महागाई,  डीजेल - पेट्रोल दर वाढ, तीन शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी व शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी खोपोली शहर कॉग्रेससह खालापूर तालुक्याच्या वतीने 27 सप्टेंबर खोपोली शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारका समोर कॉगेस तर्फे आंदोलन करीत भाजपा सरकारचा निषेध व्यक्त करीत भाजपा सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली असून यावेळी कॉग्रेसच्या वतीने खालापूरचे तहसिलदार आयुब तांबोळीना निवेदन देण्यात आले.    केंद्र सरकारने वाढवलेल्या घरगुती गँस, पेट्रोल, डिझेल महागाई विरोधात खालापूर तालुका व खोपोली शहर कॉग्रेस कार्यकर्त्यांनी खोपोली शिळफाटा आवारात 27 सप्टेंबर रोजी केंद्र सरकार विरोधात निदर्शने करीत केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या असून देशातील शेतकरी व जनतेला भूलथापा देऊन सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारने दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन यांनी आपल्या विचार व्यक्त करताना म्हणाले की देशातील जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात केला असून नुकताच तीन शेतकरी विरोधी काळे कायदा लागू केला असून ते कायदे रद्द करण्यासाठी कॉग्रेस संपूर्ण देशात आंदोलन केले असता खालापूर कॉग्रेस व खोपोली कॉग्रेसच्या वतीने भाजपा सरकारचा जाहिर निषेध करण्यात येत आहे. येत्या काळात भाजपा सरकारने हे कायदे रद्द व महागाई कमी न केल्यास कॉग्रेसच्या वतीने पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील त्या आदेशाचे पालन करित तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तर पेट्रोलच्या दराने केव्हाच शंभरी पार केली असून डिझेल याचबरोबर घरगुती गँस, तेलाचे भाव गगनाला भिडल्याने या महागाईने सर्वसामान्याचे आर्थिक बजेट कोलमडल्याचे पाहायला मिळत असताना कोरोनाच्या सद्यपरिस्थितीत गेल्या दोन वर्षापासून सर्वसामान्य नागरिक दरवाढीने भरडला गेला आहे. बेरोजगार, शेतकऱ्यांना याचा मोठ्या फटका बसला आहे. येत्या काही दिवसात आणखी किती दरवाढ होणार यांचा अंदाज बांधणे कठीण होत असल्याने केंद्र सरकारच्या मनमानी कारभाराचा अनेक जण निषेध व्यक्त करीत असताना खालापूर तालुका कॉग्रेस व खोपोली शहर कॉग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला असून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.  याप्रसंगी खोपोली शहर कॉग्रेस अध्यक्ष रिचर्ड जॉन, युवक अध्यक्ष अँड.संदेश धावारे, तालुका अध्यक्ष नाना म्हात्रे, जेष्ठ नेते कृष्णा पारांगे, सरचिटणीस रायगड जिल्हा कॉग्रेस अशोक मुंढे, शिळफाटा विभाग अध्यक्ष मेहमुद शेख, हायदर फक्की, प्रविण वेदक, जलील कुरेशी, ईरफान शेख, सागर सुखदरे, कुणाल जाधव, श्याम विनेरकर आदीप्रमुखासह मोठ्या कॉग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies