Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

शिलारवाडी,ताडवाडी,मोरेवाडी येथील ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश !

 शिलारवाडी,ताडवाडी,मोरेवाडी येथील ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश !

   महाराष्ट्र मिरर टीम-कर्जत


शिवसेना या चार  अक्षरी मंत्राने अनेक सामान्य शिवसैनिकांची व नागरिकांची कामे होत असतात. त्यातील कर्जत विधानसभा मतदार संघातील आमदार महेंद्र थोरवे यांच्याही कार्यालयात सातत्याने दररोज अनेकांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. या सर्व कामांवर विश्वास ठेवत आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिलारवाडी, ताडवाडी,मोरेवाडी येथील ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

या प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसेना पक्षावर विश्वास ठेवून येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत व अभिनंदन केले व पुढील कालावधीत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच शिवसेना पक्षाकडे येणाऱ्या नवीन नागरिकांचा व तरुणांचा ओघ सातत्याने वाढत आहे.आणि ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे. असे मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी उपतालुका प्रमुख दिलीप ताम्हाणे, संपर्क प्रमुख पंकज पाटील,मा उपसभापती मनोहर थोरवे, विभाग प्रमुख योगेश दाभाडे, संदेश सावंत, बाजीराव दळवी, अनिल शेमटे, गणेश भगत तसेच पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies