खालापूर येथे साकारणार नवीन प्रशासकीय भवन !
दत्ता शेडगे-खालापूर
सर्व सामान्य नागरिक स्वतःच्या अथवा सार्वजनिक कामासाठी अनेकदा तहसिल कार्यालय, सब रजिस्टर अशा अनेक शासकीय कार्यालयात ये-जा करत असतात व त्यांची कामे वेळेवर तसेच सुरळीत व्हावी हे प्रत्येक नागरिकांची अपेक्षा असते.
याच धर्तीवर खालापूर येथील तहसिल कार्यालयास अद्याप पर्यंत प्रशस्त अशी प्रशासकीय इमारत उपलब्ध नाही व असणारी इमारत अत्यंत जीर्ण झालेली आहे तसेच अनेक शासकीय कार्यालये भाड्याच्या जागेत काम करत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून आमदार महेंद्र थोरवे यांनी दिनांक २३ मे २०२१ रोजी नवीन प्रशासकीय भवन बांधणे करीता मागणी केली होती.
याच आधारावर आमदार महेंद्र थोरवे यांच्या मागणीनुसार राज्य शासनाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने २९ सप्टेंबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता व १० कोटी ९६ लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आला आहे..
यामुळे खालापूरकरांसाठी लवकरच प्रशासकीय भवन साकारणार आहे. या निर्णयामुळे आमदार महेंद्र थोरवे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे..