महिला कॉन्स्टेबलवर तिघांनी केला बलात्कार
मुख्य आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, बाकी फरार
भोपाळ-वृत्तसंस्था
राज्यात आणि देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून नराधमांना कायद्याचा धाकच उरला नसल्याचे समोर आलेल्या घटनांवरून स्पष्ट होतंय.पीडित महिला कॉन्स्टेबलवर या नराधमांनी बलात्कार करून या कृत्याचा व्हिडीओ शूट करून जीवे मारण्याची धमकी या आरोपींनी पीडितेला दिली. आरोपी पवनने फेसबुकवरून मैत्री केली आणि नंतर व्हाट्सअप्प वर त्यांचं बोलणं होऊ लागलं आणि ते भेटू सुद्धा लागले.आरोपी पवन हा मनसा शहरातील आहे तो पीडितेला इंदोर येथे भेटायला गेला होता त्याच्या भाऊच्या वाढदिवसाचे निमंत्रण दिलं,तेव्हा पवनच्या घरी भाऊ धीरेंद्र आणि विजय यांनी पीडित महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार केला आणि या कृत्याचा व्हिडीओ केला व जीवे मारण्याची धमकी दिली.पवन घरी आल्यावर पीडितेने घडलेली हकीगत सांगितली .तेंव्हा त्यानेही तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान पोलिसांनी मुख्य आरोपी आणि त्याची आईला अटक केली असून बाकी तिघे आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस स्टेशनच्या प्रभारी अनुराधा गिरवाल यांनी दिली.