मुरूड तालुक्यातील बोर्ली मांडला विभागात काल दिं 6 सप्टेंबर2021 रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली .मांडला ग्रामपंचायत हद्दीतील मांडला महाळूनंगे दरम्यान असणाऱ्या नदीच्या पाण्याची पातळी ही वाढल्याने तसेच मांडला गावात सुद्धा जवळपास अडीच फूट पाणी आले होते.यामुळे मांडला आणि महाळूनगे गावादरम्यान वाहतुक ही बंद करण्यात आली होती.रात्री मुरूड तहसीलदार गोविंद वाकडे,नायब तहसीलदार रवींद्र सानप,मुरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक थोरात आदींनी गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली