उद्याच भविष्य तिच्याच उदरात!
जागतिक कन्या दिनानिमित्त महाराष्ट्र मिररच्या पुणे येथील प्रतिनिधी प्रियांका ढम यांनी लिहलेला लेख.
घरात मुलगी जन्माला येणं ही एक भाग्याची गोष्ट आहे. निसर्गाने स्त्रीकडे प्रजनन शक्ती दिलेली आहे. कारण स्त्री ही घराचा कणा असते. एक स्त्री घर आणि समाज अशा दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमरित्या सांभाळू शकते. यासाठीच घर आणि समाजात प्रत्येक स्त्रीला सन्मानाची आणि आदराची वागणूक मिळणं गरजेचं आहे. मात्र दुर्देवाने समाजात असं चित्र दिसत नाही. जागतिक कन्या दिन कधी असतो, हेही बरेच जणांना माहीत नसतं. यंदा 2021 मध्ये जागतिक कन्या दिन 26 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज आला आहे.
पाहुनी रूप गोंडस मनी माया दाटते, अशी कळी मग गर्भातच का नकोशी वाटते. मुलींना जगवा, मुलींना वाचवा. आज प्रत्येकाला मुलगा हवा आहे मुलगी नको पण असा दुजाभाव कशाकरीता तिच्याच उदरात उद्याचा भविष्य जन्म घेणार आहे ना मग तुम्हाला तीच का नको? पाशवी बलात्कार, हिंसाचार ,घरगुती वाद ,हुंडा, सासरी जाचहाट या प्रकरणामुळे मुली स्वतःला संपवू लागल्या आहेत त्यामुळे कदाचित मुलगी नको अशी मानसिकता तयार होत आहे परंतु जर मुलगा असेल तर त्यालाच मुलींचा आदर करायला तुम्ही शिकवा घरी तुम्ही तुमच्या बायकोचा ,आईचा सुनेचा आदर करा म्हणजे मुलांवर आपोआपच ते संस्कार होतील आणि मुलींना पण स्व संरक्षण करण्याची ताकत द्या स्वयंपूर्ण बनवा प्रत्येक कुटुंबाचं कुळ वाढवतात मुली, पण तरीही का पायाखाली तुडवल्या जातात मुली, मुलींना प्रेम द्या आणि कुटुंबात मानाचं स्थान द्या !
आणि जबाबदार नागरिक म्हणून मुलींना मान द्या. सुरक्षित वाटेल असे वर्तन केले पाहिजे जिथे अन्याय होत असेल तिथे वाचा फोडली पाहिजे प्रत्येक मुलगी आपली जबाबदारी आहे मुलगी वाचवा देश वाचवा
जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा