नागठाणे गावात प्रथमच सामूहिक भरणी श्राद्ध
कुलदीप मोहिते-सातारा
सध्या कोरोना मुळे सर्व कार्यक्रमात बदल झाले आहेत आणि हे बदल काही प्रमाणात जनतेने ही स्वतः मध्ये करून घेण्यास सुरुवात केली आहे आणि हीच बदलती पावले ओळखताना नागठाणे तालुका सातारा येथील ग्रामस्थांनी सामूहिक भरणी श्राद्धाचा निर्णय घेतला. या निर्णयाला आज चांगलाच प्रतिसाद लाभला. वेळेच्या, खर्चाच्या बचतीच्या दृष्टीनेही या निर्णयाला वेगळे परिमाण लाभले.
नागठाणे हे सातारा तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव. लोकसहभागातून आजवर या गावाने विविध निर्णयांची अंमलबजावणी यशस्वीपणे केली आहे. अलीकडेच गावात भरणी श्राद्धाचा विधी एकत्रितपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या दृष्टीने 'व्हाॅटस अप'वरुन याविषयी आवाहन करण्यात आले होते. आज श्राद्धाचा मुख्य दिवस. या दिवशी हा निर्णय यशस्वीपणे अंमलात आला. गावातील मध्यवर्ती ठिकाणी सामूहिक भरणी श्राद्धाच्या विधीचे आयोजन करण्यात आले. त्यास मोठा प्रतिसाद लाभला. एरवी स्वतंत्र विधी करताना प्रामुख्याने वेळेची समस्या निर्माण होत असे. खर्चदेखील होत असते. काहींच्या धार्मिक विधीला बराच उशीरही लागत असे. काही गावांत वादाचे प्रसंग उभे राहात. या पार्श्वभूमीवर, नागठाणे गावात श्रद्धा, रूढी, परंपरा, लोकभावना आदींचा समतोल साधत सामूहिक भरणी श्राद्ध एकत्रितपणे करण्याचे ठरविण्यात आले. कोरोनाचे नियम पाळत सदरचे विधी करण्यात आले