Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

मुलीचा अश्‍लिल व्हिडिओ शूट करणाऱ्या केअरटेकर तरुणाला मुलीच्या भावानेच रंगेहात पकडून दिल पोलिसांच्या ताब्यात!

मुलीचा अश्‍लिल व्हिडिओ शूट करणाऱ्या केअरटेकर तरुणाला मुलीच्या भावानेच रंगेहात पकडून दिल पोलिसांच्या ताब्यात!

              दिनेश हरपुडे-कर्जत


कर्जत तालुक्यातील फार्महाऊस रिसॉर्टवर फिरण्यासाठी आलेल्या तरुणीचा अंघोळ करतानाचा अश्‍लिल व्हिडिओ शूट करणाऱ्या केअरटेकरला मुलीच्या भावानेच रंगेहात पकडून त्याला चोप देत नेरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.विनीत वामन मोहिते असे या आरोपी तरुणाचे नाव आहे.

       कर्जत तालुक्यातील नेरळ वाकस ग्रामपंचायत हद्दीतील नेवाळी येथे असलेल्या,सिद्धार्थ फार्म हाऊसवर, 28 सप्टेंबर रोजी डोंबिवली येथील राहणारे आठ तरुण तरुणीचा ग्रुप फिरण्यासाठी आला होता.यावेळी 22 वर्षीय तरुणी स्विमिंग करून झाल्यानंतर शॉवर घेण्यासाठी बाथरूम मध्ये गेली असता,फार्महाऊस येथील काम करणारा केअरटेकर विनीत मोहिते हा तरुण देखील तिच्या मागे बाथरूम मध्ये गेला असता,22वर्षीय तरुणीच्या भावाने पाहिले.यावेळी विनित हा आपल्या मोबाईल मधून दरवाज्याच्या "की" होल मधून मोबाईलच्या कॅमेरात  व्हिडिओ शूट करताना मुलीच्या भावाला आढळून आल्याने उपस्थित संतप्त तरुणांनी विनितला चोप देत नंतर नेरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.

 यावेळी आरोपी विनीत मोहिते याला नेरळ पोलिसांनी अटक करून त्याच्या विरोधात 354 कलम अंतर्गत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.तर सदर घटने बाबत अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies