शेकाप हा नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काम करणारा पक्ष : पंडित पाटील
अमूलकुमार जैन-अलिबाग
पनवेल तालुक्यातील खानाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर चुकीच्या नोंदीमुळे अन्याय झालेल्या .शेतकऱ्यांना न्याय देण्यासंदर्भात शेकाप नेते पंडित पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने राजस्व सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय ,अलिबाग येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव , माजी आमदार पंडित पाटील, विधान परिषदेचे आमदार बाळाराम पाटील. यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली . यावेळी शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही तसेच सदरच्या प्रकरणात लवकरच निर्णय घेणार असल्याचे ग्वाही प्रशासनाच्या वतीने देण्यात आली .
शेतकरी कामगार पक्ष हा नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काम करणारा पक्ष आहे सदरचे प्रकरण मार्गी लावण्याकरता सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे शेकाप नेते पंडित पाटील यांनी सांगितले.