Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते माथेरान मधील विविध विकासकामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते माथेरान मधील विविध विकासकामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

चंद्रकांत सुतार-माथेरान

माथेरान गिरीस्थान नगरपरिषद येथील विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा राज्याचे पर्यटन,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे, श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे आदेश बांदेकर, मावळ मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे, मुंबई महापौर किशोरी पेडणेकर, स्थानिक आमदार महेंद्र थोरवे,जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकार,माथेरान हेरीटेज कमिटी चेअरमन एस. बी. पाटील यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की माथेरान वर माझे विशेषतः प्रेम असून इथला निसर्ग खूपच पाहण्यासारखा आहे.या गावाला अन्य पर्यटनस्थळ प्रमाणे दवाखान्यात योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध होतील लवकरच नगरपरिषदेच्या अखत्यारीत असलेल्या या दवाखान्याला नवसंजीवनी प्राप्त करून देण्यासाठी आम्ही सर्व उपस्थित मंडळी नक्कीच प्रयत्न करू असे स्पष्ट केले माझी वसुंधरामोहिमेअंतर्गत बिल्ले, घडीपत्रिका व स्टिकरचे प्रकाशन आदित्य ठाकरे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याधिकारी सुवर्णा भणगे यांनी केले. या कार्यक्रमात नागरिकानी उपस्थिती दर्शवली तसेच भाजपचे सर्व नगरसेवक नगरसेविका,गटनेते प्रसाद सावंत, शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, नगरसेवक शिवाजी शिंदे यांसह विविध मंडळाचे पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, व्यापारी ,दुकानदार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies