Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

गड सर करण्याऱ्या हिरकणीवर काळाची झडप.!

 

गड सर करण्याऱ्या हिरकणीवर काळाची झडप.!

प्रियांका ढम - पुणे

  • हिरकणी रायडर्स सातारा 'शक्तीपीठ' मोहिमेवर निघालेल्या शुभांगी पवार यांचे अपघाती निधन...
  • नांदेडच्या भोकरफाटा (दाभड) येथील अपघातात टँकरच्या धडकेत एक ठार.
  • राष्ट्रीय महामार्गाच्या गुत्तेदारा विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा संदिप राऊत यांची मागणी.

                   बाईक रायडरमधील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत सातारच्या हिरकणी बाईक राईड करत साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी मोहिमेतील हिरकणी बाईक रायडर्सच्या ग्रुपमधील शुभांगी संभाजी पवार वय ३२ वर्षे यांचे आज  दि. १२ मंगळवारी रोजी ९-४५वा.अर्धापूर तालुक्यातील भोकरफाटा येथे अपघात झाला.या अपघातात क्र. ( जि.जे.१२ ए.टी.६९५७ ) टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने अपघात त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

सातारा येथील हिरकणी ग्रुपच्या नऊ महिला सदस्या दि.१० ऑक्टोबर रोजी १ हजार ८६८ किमी प्रवासासाठी मोटार सायकलने नवरात्रोत्सवात आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपिठांचे दर्शन घेण्यासाठी साताऱ्यातील हिरकणी बाईक रायडर्स निघाल्या होत्या.

महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहाव्यात. बाईक रायडींगमध्ये तरी मागे का रहायचे या विचाराने प्रेरित होवून हिरकणी बाईक रायडर ग्रुपच्या वतीने साडेतीन शक्तीपीठ दर्शन ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.या मोहिमेत ब्रेस्ट कॅन्सर, रस्ते सुरक्षा जनजागृती, महिला सबलीकरण करत १० जिल्हे व १४ तालुक्यातून ही मोहीम राबविण्यात येत होती. या मोहीमेत अपघातातील मयत शुभांगी पवार यांच्या सह मनिषा फरांदे,अंजली शिंदे, मोना निकम जगताप, अर्चना कुकडे, ज्योती दुबे, केतकी चव्हाण, भाग्यश्री केळकर, श्रावणी बॅनर्जी, उर्मिला भोजने या सदस्या सहभागी होत्या.


दरम्यान सातारा येथून दि.१० ऑक्टोबर रोजी प्रवासास प्रारंभ झाला,सुरुवातीला कोल्हापूर येथील महालक्ष्मी व तुळजापूर येथे भवानी मातेचे दर्शन घेऊन, नांदेड येथुन - माहूर, वाशी, औरंगाबाद, नाशिक, वणी व पुन्हा सातारा असा सुमारे १ हजार ८६८ किमीचा प्रवास करून गड गाठणा-या हिरकणीवर अर्धापूर तालुक्यातील भोकरफाटा येथे काळाचा घाला झाला.शुभांगी पवार यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाले.

नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून संबंधित गुत्तेदारांनी एक साईट रस्ता तयार करणे गरजेचे असतांना सुद्धा दुसरा साईट चा रस्ताचे सुरू करावे अशा सूचना राष्ट्रीय महामार्गाच्या असतांना सुद्धा या रस्त्यावर वाहन चालवीत असताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे राष्ट्रीय महामार्गाच्या गुत्तेदार यांच्या निष्काळजीपणामुळे हिरकणी रायडर्स ग्रुपच्या शुभांगी संभाजी पवार यांचा अपघात रस्ता कामामुळे झाला असल्याने या रस्त्याचे काम करणाऱ्या गुत्तेदार विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष संदिप राऊत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या अपघाताची माहीती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक जाधव,पोलीस उपनिरीक्षक कपील अगलावे,कर्मचारी महेंद्र डांगे,महामार्गचे रमाकांत शिंदे,गजानन डवरे,महेश कात्रे,वसंत सिनगारे, मृत्युंजय दूत गोविंद टेकाळे यांनी अपघात ग्रस्तांना मदत केली. टँकर अर्धापूर पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies