प्रसिद्ध शिवव्याख्याते शुभम चोहान यांची उंब्रज-कराड येथील प्रस्तावित शिवस्मारकाच्या जागेस सदिच्छा भेट
कुलदीप मोहिते-कराड
उंब्रज ता कराड श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जात व 12 बलुतेदार यांना केंद्रस्थानी ठेवून स्वराज्याची स्थापना केली या छत्रपती शिवाजी महाराजांच्याकार्याचा आदर्श समोर ठेवून उंब्रज येथील श्री शिव योद्धा प्रतिष्ठान व उंब्रज ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा 16 फुटी अश्वारूढ पुतळा उंब्रज बाजारपेठेमध्ये मध्यवर्ती ठिकाणी उभा करण्याचा संकल्प हाती घेतलेला आहे
संकल्प पूर्ण करण्यासाठी उंब्रज व आजूबाजूच्या परिसरातील सर्व ग्रामस्थ व श्री शिव योद्धा प्रतिष्ठान चे कार्यकर्ते तन-मन-धन अर्पण करून या शिवकार्यात सामील होत आहेत याचे औचित्य साधून प्रसिद्ध शिवव्याख्याते शुभम चोहान यांनी उंब्रज तालुका कराड येथील प्रस्तावित 16 फुटी अश्वरुढ पुतळ्याच्या शिवस्मारकाच्या जागेस सदिच्छा भेट दिली तसेच तेथील श्री जानाई देवी देवस्थान श्री भवानी देवी देवस्थान श्री भैरवनाथ देवस्थान ला ही भेट दिली यावेळी शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभमुहूर्तावर प्रस्तावित शिव स्मारकाच्या उभारणीसाठीलागणारा निधी गोळा करण्याचा शुभारंभही करण्यात आला
शिवस्मारकामुळे उंब्रज गावच्या वैभवात भर पडून युवा पिढी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पोहोचवण्यास मदत होईल असे गौरवोद्गार ह्या वेळी शुभम चोहान यांनी काढले त्यांचा शाल व श्रीफळ देऊन श्री शिव योद्धा प्रतिष्ठान व उंब्रज ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने उंब्रज ग्रामस्थ व श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते