नाम फाउंडेशनची रायगड जिल्ह्यात प्रथमच मदत
- नाम फाउंडेशनची रायगड जिल्ह्यात प्रथमच गोखले एज्युकेशन सोसायटीच्या न्यू मॉर्डन इंग्लिश हायस्कुल शिस्ते आणि गोखले महाविद्यालय श्रीवर्धन येथे मदत
- शिवम् मेडीकलचे संचालक शिक्षण प्रेमी नितीन सुर्वे,समीर सुर्वे यांच्या प्रयत्नांना यश
अमोल चांदोरकर - श्रीवर्धन
श्रीवर्धन तालुक्यातील न्यू मॉर्डन इंग्लिश हायस्कुल,शिस्ते आणि कला,वाणिज्य,विज्ञान व वरिष्ठ महाविद्यालय श्रीवर्धन या गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक या संस्थेच्या दोनही ठिकाणी रायगड जिल्ह्यात प्रथमच अभिनेता पदमश्री पुरस्कार प्राप्त विख्यात सिनेनट नाना पाटेकर आणि अभिनेता मकरंद अनाजपुरे यांच्या नाम फाऊंडेशनने भरघोश अशी मदत केली.
३ जुन २०२० रोजी निसर्ग वादळाने झालेल्या हानीमुळे विद्यालयीन कामकाज पूर्ववत होण्यास आवश्य असणाऱ्या शैक्षणिक साहित्य श्रीवर्धन गोखले महाविद्यालयाला व न्यू मॉर्डन इंग्लिश स्कुल कापोली येथे काही दिवसा अगोदर झालेल्या चोरीच्या कारणाने केलेली नासधुस दरम्यान नुकसानीचे नाम फाऊंडेशन या नामांकित सेवा भावी संस्थेने ६ लॅपटॉप,३ प्रिंटर,३ प्रोजेक्ट मशीन व भौतिक शास्त्र प्रयोग शाळेचे साहित्य असे एकूण अंदाजे ७ लाख रुपये किंमतीच्या साहित्यांचे वितरण शुक्रवार दि.२२ ऑक्टोबर रोजी करण्यात आले.यावेळी गोखले एज्युकेशन सोसायटीचे शाखा सचिव प्राचार्य एम.आर.मेश्राम यांनी नाम फाऊंडेशनचे संस्थापक व प्रसिध्द सिने अभिनेते पदमश्री नाना पाटेकर,सिने अभिनेता मकरंद अनासपुरे,नामचे कोषाध्यक्ष राजीव सावंत यांचे आभार मानून ऋण व्यक्त केले.
नाम फाऊंडेशन व त्यांच्या कार्याचा गौरव करतांना.प्राचार्य डॉ.श्रीनिवास जोशी यांनी महाविद्यालयास प्राप्त झालेले साहित्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास कामी आहे.असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.वरील सर्व साहित्य महाविद्यालयास मिळावं या साठी महाविद्यालय विकास समिती सदश्य,आरोग्य व शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेले माजी विद्यार्थी,शिक्षण प्रेमी नितीन गजानन सुर्वे यांनी प्रयत्न केले.संस्थेचे अध्यक्ष प्रिंसिपल एस.बी.पंडीत ,सेक्रेटरी प्रिंसिपल डॉ. एम.एस.गोसावी ,झोनल सेक्रेटरी प्रिंसिपल एस.व्ही.संत व एच.आर.डायरेकटर,प्रिंसिपल दिप्ती देशपांडे या सर्वांनीच नाम फाऊंडेशनच्या कार्याचा गौरव केला.या कार्यक्रमाला सरपंच आराठी ग्रा.पं.परवीन नाझ, उप-प्राचार्य निलेश चव्हाण,डॉ.कात्रे,शाळा समवय एम.एम.बापट,प्रिंसिपल संतोष मुरकर,शिक्षकहृद,विद्यार्थी उपस्थित होते.