उरुळी कांचन गोळीबार प्रकरणी दोन हल्लेखोरांना आठ दिवसाची पोलीस कोठडी
प्रियांका ढम- पुणे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळू व्यवसायिक संतोष जगताप याच्यावर दिवसाढवळया लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये उरळी कांचन येथील हॉटेल सोनाईसमोर गोळीबार झाला होता, त्यामध्ये संतोष जगताप हा जागीच ठार झाला असून त्याचा अंगरक्षक गंभीर जखमी झाला होता, त्याबाबतबलोणी-काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून गुन्हयाचा तपास गुन्हे शाखेमार्फत चालू असताना अपर पोलिस आयुक्त,गुन्हे,पुणे शहर,रामनाथ पोकळे यांना हल्लेखोरांचा ठिकान्याविषयी माहिती मिळाली.त्यानुसार गुन्हे शाखा,युनिट-६ चे अधिकारी यांना याबाबत माहिती देवून पथक तयार करून त्या ठिकाणी जावून त्यांना शोध घेण्याच्या सूचना दिल्या यावर पथकासह त्याठिकाणी जावुन १)पवन गोरख मिसाळ,वय-२९ वर्षे,धंदा-खडी सप्लायर,रा.दत्तवाडी,उरळी-कांचन, हवेली,जि.पुणे २)महादेव बाळासाहेब आदलिंगे, वय-२६ वर्षे, धंदा-शेती,रा.जूनी तांबे वस्ती, दत्तवाडी,उरळी-कांचन, हवेली, जि.पुणे यांना ताब्यात घेतले
ही विशेष कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्त पुणे शहर,डॉ.रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे
शहर, रामनाथ पोकळे, पोलिस उप आयुक्त, गुन्हे शाखा,पुणे शहर, श्रीनिवास घाडगे, सहा पोलीस आयुक्त,गुन्हे शाखा,पुणे शहर, लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा,युनिट-६ चे पोलीस निरीक्षक, गणेश माने, सहा. पो.निरी नरेंद्र पाटील,पो.उप.निरी.सुधीर टेंगले, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहासतांबेकर यांनी केली आहे.
आज त्या दोन हल्लेखोराना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.