Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

पत्रकार असल्याचे सांगून पाच लाखाची खंडणी मागणारा लोणी काळभोर पोलिसांनी केला गजाआड

 पत्रकार असल्याचे सांगून पाच लाखाची खंडणी मागणाऱ्याला लोणी काळभोर पोलिसांनी केला गजाआड


प्रियांका ढम-पुणे


पत्रकार असल्याचे सांगुन खंडणी घेणा-यांना बहाद्दरास खंडणी घेताना आज रंगेहाथ पकडले यात एकूण सहा जणांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.

      .राजेंद्र मोकाशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलकी त्यांना एका बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, उरुळीदेवाची येथील बाजारेमळ्यात राहणारा अबु शेख रा.मार्केटयार्ड पुणे यांने अवैध्द गुटखा साठा केला असुन त्याबाबत पञकार प्रविण झेंडे यांना माहीती मिळाली त्यावर त्याने अबु शेख याचेकडे ५,००,०००/- ( पाच लाख)रु.ची खंडणीची मागणी केली असुन ती रक्कम घेण्यासाठीबाजारेमळा,स्मशानभुमीजवळ,उरुळीदेवाची ता.हवेली जि.पुणे येथे येणार आहेत.अशी बातमी मिळाल्यावर राजेंद्र मोकाशी यांनी पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर यांना यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.त्यानुसार निंबाळकर यांनी उरुळीदेवाची येथील पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन त्याठिकाणी जावुन सापळा रचुन थांबले. धरुन थांबले असताना बातमीप्रमाणे व्यक्ती त्यांचेकडील क्रेटा चारचाकी गाडी मधुन आले.थोडया वेळाने एक जण पायी चालत आला व त्याने क्रेटा गाडीमधुन आलेल्या व्यक्तीला रक्कम दिल्याचे निर्दशनास आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक निकेतन निबाळकर व पोलीस पथकाने अचानक त्यांचेवर छापा घातला, पोलीसांची चाहुल लागल्याने ते तेथुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन जात असताना पोलीस पथकाने अंधारामध्ये त्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडले.यात१) विनोद अंबादास साळुंके वय ४५ वर्षे, रा. काञज,पुणे २) प्रविण बाजीराव झेंडे वय २७

वर्षे,रा.जिजामाता चौक,आंबेगाव पठार,पुणे ३) प्रमोद भानुदास घोणे वय २६ वर्षे, रा.धनकवडी,पुणे ४) सोमनाथ यशवंत भडावळे वय ३३ वर्षे,रा.धनकवडी,पुणे ५) बबन अंबादास साळुंके वय ४४ वर्षे,रा.फालेनगर, काअज,पुणे ६) परमेश्वर

अभिमान यमगर वय ३५ वर्षे, रा. फालेनगर,काञज,पुणे अशी सांगितली तसेच त्यांना रक्कम देण्यास आलेला व्यक्ती अबु सहामा शेख वय ३६ वर्षे रा. मार्केट यार्ड. पुणे असे सांगितले. त्यावेळी

पोलीस पथकाने ताब्यातील व्यक्तीकडे अधिक चौकशी केली असता अबु सहामा शेख याने त्याचेबाजारेमळा येथील गोडावुनमध्ये अवैध गुटखा साठा करुन ठेवल्याचे सांगुन तोतया पत्रकार प्रविण

झेंडे यांस समजल्याने त्याने पञकार असल्याचे सांगुन सदरबाबत पोलीसांना न कळीवण्यासाठी ५,००,०००/- ( पाच लाख) रु.ची खंडणी मागीतली असुन त्यापैकी २,५०,०००/- (अडीच लाख) रु देण्यासाठी आलो असल्याचे सांगितले.त्यानुसार वरील सहा जणांनी आणलेल्या क्रेटा चारचाकी गाडीतुन २,५०,०००/ (अडीच लाख) रु रोख रक्कम

मिळुन आली ती रोख रक्कम व गुन्हयात वापरली क्रेटा चारचाकी गाडी तसेच अबु सहामा शेख याचे गोडावुन तपासले असता त्यामध्ये मिळुन आलेला किं.रु.९८,७२८/- चा हिरा कंपनीचा गुटखा असा एकुण रु.११,४८,७२८/- (अकरा लाख अठठेचाळीस हजार सातशे अठठावीस) चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

        ही कामगीरी नामदेव चव्हाण,नम्रता पाटील, पोलीस उप आयुक्त,परीमंडळ-५ ,कल्याणराव विधाते,सहा. पोलीस आयुक्त,हडपसर विभाग,राजेंद्र मोकाशी(वरीष्ठ पोलीस निरीक्षक), सुभाष काळे,पोलीस निरीक्षक(गुन्हे) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर बिडवे, पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, प्रमोद हंबीर, पोलीस हवालदार शंकर नेवसे,पोलीस शिपाई अभिजीत टिळेकर, हेमंत कामथे, सत्यवान चव्हाण व दिपक सोनवणे यांचे पथकाने केली आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies