Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.स्वप्ना यादव नवराष्ट्र सहकार पुरस्काराने सन्मानित

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.स्वप्ना यादव नवराष्ट्र सहकार पुरस्काराने सन्मानित

नवभारत ग्रुप तर्फे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेला नवराष्ट्र सहकार पुरस्कार २०२१ प्रदान

            ओंकार रेळेकर-चिपळूण


 नवभारत ग्रुप तर्फे नवराष्ट्र सहकार पुरस्कार २०२१ हा चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेला नुकताच प्रदान करण्यात आला.  हा पुरस्कार पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते स्वीकारला. हा कार्यक्रम वाय बी चव्हाण सेन्टर, मुंबई नरिमन पॉइंट येथील रंगस्वर सभागृहात नुकताच झाला.  

               या पुरस्काराबद्दल चिपळूण नागरी पतसंस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.चिपळूण नागरी पतसंस्थेची १९ ऑक्टोबर १९९३ ला स्थापना झाली आहे या संस्थेने 'आपली माणसे आपली संस्था' या वाक्याप्रमाणे सभासदांशी आपुलकीचे नाते ठेवले आहे विशेष म्हणजे गरजवंताला अल्पावधीतच कर्जपुरवठा करीत आहे यामुळे करवंदाची कर्जाची गरज पूर्ण होत आहे इतकेच नव्हे तर सुशिक्षित बेरोजगारांना सह शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने या संस्थेने नेहमीच सहकार्याची भूमिका ठेवली आहे. यामुळे आजवर हजारो शेतकरी व सुशिक्षित तरुण स्वावलंबी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या संस्थेने अल्पावधीतच यश संपादन केल्याने या संस्थेला आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. संस्थेची यशस्वी वाटचाल संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. याकरता संचालक मंडळासह अधिकारी व कर्मचारी वर्गाची देखील मोलाची साथ मिळत आहे. 

          संस्थेची सभासद संख्या १ लाख २७ हजार ४१७ इतकी आहे. भागभांडवल ६० कोटी ५१ लाख रुपये, स्वनिधी ११५ कोटी ५७ लाख रुपये,  ठेवी ८५७ कोटी ५६ लाख, कर्जे ६९३ कोटी ८५ लाख, प्लेज लोन ३०२ कोटी ९५ लाख, पैकी सोने कर्ज  २७० कोटी ६४ लाख रुपये, मालमत्ता २७ कोटी ५३ लाख, नफा मार्च २०२१ अखेर १७ कोटी ७७ लाख रुपये अशी या संस्थेची वाटचाल ५० शाखांच्या माध्यमातून यशस्वीपणे सुरू आहे याची दखल घेऊन नवभारत ग्रुपने चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेला नवराष्ट्र सहकार पुरस्कार २०२१ नुकताच जाहीर केला होता. यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार संजय राऊत, राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदारी, ना. विश्वजीत कदम अनुपकुमार आदी मान्यवर उपस्थित होते तसेच नवभारत ग्रुपचे संचालक मंडळ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies