माध्यमिक कर्मचारी यांचे वेतन राष्ट्रीय बँकेत व्हावे यासाठी शिक्षक सेनेचे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर धरणे आंदोलन
अमूलकुमार जैन-अलिबाग
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे पदाधिकारी यांची भेट निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी भेट घेत त्यांच्या दालनात निवेदन स्वीकारले.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले की, भारतीय राज्य घटनेचे कलम २१ व्यक्ति स्वातंत्र्य कलम १९(१)(ग) नुसार व्यापार, नोकरी,व्यवसाय व वाणिज्य तथा आर्थिक व्यवहार करण्याचे स्वातंत्र्य संविधानाने प्रदान केले आहे.महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागशासन निर्णयानुसार कर्मचारी यांचे वेतन राष्ट्रीय बँकेत करण्याचे स्पष्ट आदेश असताना देखील रायगड जिल्ह्यातील कर्मचारी यांचे वेतन हे आजपर्यंत जिल्हा बँकेत होत आहेत.वित्त विभाग यांच्या आदेशानुसार कर्मचारी व अधिकारी यांचे वेतन कोणत्या बँकेत जमा करण्यात यावे हे ठरविण्याचे सर्वस्वी अधिकार व हक्क हे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना असल्याचे स्पष्ट नमूद असताना देखील रायगड जिल्ह्यात मात्र त्या आदेशाला केराची टोपली दाखवित जिल्हा बॅंकेतूच वेतन अदा करण्यात येत आहे.रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन त्यांच्या मागणीनुसार सी.ए.मपी.प्रणाली लागू करून राष्ट्रीयकृत बँकेत वेतन अदा केले आहे. महाराष्ट्र राज्यातील इतर काही जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक कर्मचारी यांचे वेतन त्यांच्या मागणीनुसार सी.ए.मपी.प्रणाली लागू करून राष्ट्रीय बँकेमार्फत वेतन अदा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.सोलापूर जिल्ह्यात माध्यमिक कर्मचारी यांनी माहे ऑगस्ट २०२१ ,पेड इन सप्टेंबर २०२१ वेतन हे राष्ट्रीयकृत बँकेमार्फत घेण्यात आले आहे.
राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत वेतन घेतल्यास कर्मचाऱ्यांना उत्तम सेवा,झिरो बॅलन्स अकाउंट,नेट बँकिंग, एटीएम व क्रेडिट कार्ड सुविधा, वेतनावर काही कालावधीनंतर ओडी सुविधा, फ्री अपघात विमा,आर.टी.जी.एस. व चेकबुक मोफत,बिझनेस करस्पॉंड सुविधा, वैयक्तिक, गृह,वाहन,शैक्षणिक अल्प व्याजदरात कर्ज सुविधा मिळणार आहेत.मात्र जिल्हा बँकेत यांतील काही सुविधा मिळत आहेत मात्र त्या कमी प्रमाणात आहे.
सदर निवेदनामुळे कर्मचारी यांचे हक्क, अधिकार,व मिळणारे लाभ करिता सी.ए.मपी.प्रणाली लागू करून राष्ट्रीय बँकेमार्फत वेतन करणेकरिता संबधित असणारे विभाग ,अधिकारी, कर्मचारी यांना आदेश व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर निवेदनाची प्रत अधिक माहितीसाठी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांना सादर करण्यात आली आहे.
यावेळी कोकण मुख्याध्यापक संघाचे सचिव लखीचंद ठाकरे,महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जिल्हा कार्यध्यक्ष कौशिक ठाकूर,शिक्षक सेनेचे(माध्यमिक)जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, शिक्षक सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष(अल्पसंख्याक विभाग)फरीदुल काजी,सेनेचे विभागीय सचिव कौशिक ठाकूर,शिक्षक सेनेचे(माध्यमिक)जिल्हाध्यक्ष शिक्षक सेनेचे(प्राथमिक)जिल्हाध्यक्ष रोशन तांडेल,शिक्षक सेनेचे जिल्हा सचिव( प्राथमिक) हितेंद्र म्हात्रे आदीसाहित पदाधिकारी उपस्थित होते.