सांगवी मुळानगर येथील मनपा मलनिसारण पंपिंग स्टेशनला आग
मिलिंद लोहार पुणे
जुनी सांगवी मुळानगर येथील मलनिसारण पंपिंग स्टेशनला दुपारी ३:३० शॅाटसर्किट झाल्याने आग लागली .तेथील स्थानिक नागरिकांनी फोन केला व महावितरण,अग्निशमन,पोलीस मनपा विद्युत विभाग यांना त्वरित संपर्क करुन कळविण्यात आले.वितरणचे कर्मचारी त्वरित येऊन विद्युत खंडीत करण्यात आला १५ ते २० मिनीटामध्ये अग्निशमन दल पोहचले आग विझवण्यात यश आलं. यावेळी आगीमध्ये विद्युतचा पॅनेललाच आग लागली होती त्वरित उपाययोजना झाली त्यामुळे आग आटोक्यात आली कोणतीही मनुष्यहानी किंवा जास्त नुकसान झाले नाही