Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

मुंबईत 1 डिसेंबरला एनयुजे महाराष्ट्रचे राज्यस्तरीय अधिवेशन!

मुंबईत 1 डिसेंबरला एनयुजे महाराष्ट्रचे राज्यस्तरीय अधिवेशन!              

  • पत्रकारितेचे भविष्य - विषयावर होणार मंथन! 
  • पत्रकारितेसह विविध क्षेत्रातील गुणवंताचा होणार गौरव!                 
  • कोल्हापूर जिल्हा सर्वोत्कृष्ट म्हणून, तर बेळगाव जिल्ह्याचा मराठीच्या कार्यासाठी  गौरव होणार!
  • फोटोग्राफी स्पर्धेतील विजेते होणार सन्मानीत!                                            

              महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई


एनयुजेमहाराष्ट्रचे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या 1 डिसेंबर2021  रोजी मुंबईत होणार आहे!  पत्रकारितेसह  सामाजिक, आरोग्य,उद्योग, शिक्षण, प्रशासकीय, राजकीय आदि क्षेत्रातील  सामाजिक बांधिलकीतून योगदान देणारे मान्यवर ; शासकीय, खाजगी क्षेत्रातील जनसंपर्क अधिकारी  (जे खरे पत्रकार असतात)  व संस्था  तसेच एनयुजेमहाराष्ट्र चा सर्वोत्कृष्ट कार्यरत जिल्हा,मराठीसाठी काम करणारे माध्यमकर्मी, आदिचा गौरव करण्यात येणार आहे!                                                                या कार्यक्रमात "पत्रकारितेचे भविष्य" या विषयावर परिसंवाद होणार आहे! यासाठी राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रित केले जाणार आहे!                      ब्रुसेल्सच्या इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नलिस्ट्सची सदस्य असलेल्या दिल्लीच्या एनयुजे इंडियाशी संलग्न आणि महाराष्ट्रात माध्यम हक्कासाठी आग्रही व कृतीशील असलेली नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्स महाराष्ट्र( एनयुजेमहाराष्ट्र)चे खंदे सहकारी हा अभिनव व ऐतिहासिक उपक्रम सुरू करणार आहेत!                                          दादर येथील कार्यालयात नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्स महाराष्ट्र(  एनयुजे महाराष्ट्र) पदाधिकाऱ्यांची नुकतीच महत्वपूर्ण  बैठक झाली !

याप्रसंगी एन यु जे महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांनी महत्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले !                                सद्यस्थितीत माध्यमकर्मीना आर्थिक, सामाजिक, मानसिक बळकटी देणे अत्यावश्यक आहे! म्हणूनच या कार्यक्रमात माध्यमकर्मीचे सक्षमीकरणसाठी एका ऐतिहासिक  अभिनव उपक्रमाची मुहुर्तमेढ रोवली जाण्याचे निश्चित झाले!

याप्रसंगी एन यू जे महाराष्ट्र कार्यकारणी  पदाधिकारी यांच्यासह विविध  जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.    एनयुजेमहाराष्ट्र सरचिटणीस सीमा भोईर, कोषाध्यक्ष वैशाली आहेर, संघटन सचिव कैलास उदमले, एनयुजे इंडिया  व  एनयुजेमहाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य संजना गांधी, कोल्हापूर  अध्यक्ष डॉ सुभाष सामंत, सचिव शेखर धोंगडे, औरंगाबाद अध्यक्ष डॉ अब्दुल कादीर, रत्नागिरी अध्यक्ष प्रकाश वराडकर, कोषाध्यक्ष लक्ष्मीकांत घोणसे पाटील, रायगड अध्यक्ष सुवर्णा दिवेकर, सांगली अध्यक्ष  लक्ष्मण खटके ,ठाणे कार्याध्यक्ष प्रविण वाघमारे,विदर्भ सहसंघटक विष्णू कदम यांची अधिवेशनासाठी नियोजन समिती  गठीत करण्यात आली! याचे मार्गदर्शक  मा शिवेंद्रकुमार व अध्यक्ष शीतल करदेकर असणार आहेत!गौरवान्वित होणाऱ्या मान्यवरांची नावे दिवाळीनंतर घोषित करण्यात येणार आहे!कोरोना निर्बंध लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यातील निवडक पत्रकार या अधिवेशनात सहभागी होणार आहेत!                     

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्य, सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील येड्रावकर यांची भेट एनयुजेमहाराष्ट्र च्या प्रतिनिधी मंडळाने घेतली! या अधिवेशनास सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मंत्रीमहोदयांनी  दिले!अशी माहिती प्रवक्ते संदिप टक्के यांनी दिली .
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies