दिवेआगर सुवर्ण गणेशाची पुनर्रप्रतिष्ठाना 23 नोव्हेंबरला होणार!
गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण
अमोल चांदोरकर -श्रीवर्धन
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे दिनांक 17 नोव्हेंबर1997 रोजी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कै श्रीमती द्रौपदीबाई धर्मा पाटील यांच्या बागायतीमध्ये खोदकाम करताना सापडलेल्या एका तांब्याच्या पेटीमध्ये सोन्याचा गणपती सापडला. यामध्ये सोन्याच्या मुखवट्या सहित इतर सुवर्ण अलनकार सापडले त्याने सदर मूर्ती व अलंकार दिवेआगर ग्रामस्थांच्या ताब्यात दिले व सदर मूर्ती दिवेआगर येथील गपंती मंदिरामध्ये प्रतिषतापित करण्यात आली यानंतर दिवेआगर परिसरासमवेत श्रीवर्धन रायगड जिल्ह्याचे पर्यटन वाढले. भारतीय निखात निधी अधिनियम 1978 चे तरतुदीनुसार कामकाज चालवून सदर गणपतीचा सोन्याचा मुखवटा व इतर दागिने हे बेवारस म्हNऊन जाहीर करण्यात येऊन ते सरकारच्या मालकीचे असल्याचे ठरविण्यात आले. आणि गणपती देव व पूजेची नेमणूक ट्रस्ट यांच्या संचालकांनी दिलेले बंधन पत्र आणि हमीच्या आधारे भाविकांना दर्शन घेता यावा याकरिता सदर मुखवटा आणि दागिने दिवेआगर येथील गणेश मंदिरात ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकारी रायगड यांनी 14 जानेवारी 1998 रोजी दिली होती.
दिवेआगर येथील गणपती ट्रस्टच्या पदाधिकारी यांनी सुरक्षिततेचि चोख व्यवस्था ठेवून सुद्धा दिनांक 23 मार्च 2012 रोजी सुरक्षा रक्षकांचा खून करून सदर मंदिरात दरोडा पडला व सोन्याच्या गणपतीच्या मुखवट्याची व दागिन्यांची चोरी झाली . त्या अनुषंगाने गुन्हा दाखल होऊन सर्व आरोपींना पकडण्यात आले व अलिबाग सत्र न्यायालय येथे खटल्याचे कामकाज चालून सर्व दोषींना शिक्षा ठोठावण्यात आली सदर गुन्हे केल्या नंतर आरोपींनी गणेश प्रतिमेचे तुकडे करून त्याच्या सोन्याचे लगड तयार केल्या होत्या या गुन्ह्यात 1305 ग्रॅमचा गणपतीचा अर्धांग मुखवटा आणि 161 ग्रॅमचे इतर दागिने असे एकूण 1644 ग्रॅम सोने चोरीस गेले आणि तपासंती लगडीच्या स्वरूपात 1361.43ग्रॅम सोने परत मिळविण्यात पोलिसांना यश आले. सदर खटला चालू असताना रायगड स्तर न्यायालयात सादर सोने परत मिळाले म्हणून दिवेआगर येथील गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने अर्ज करण्यात आला होता परंतु सरकारने देवस्थानला दिलेल्या मुखवट्चा अस्तित्वात राहिला नाही या कारणामुळे न्यायालयाने सदर सोने त्रयस्तला देण्यास नकार दिला आणि सोने सरकार जमा करण्याचा आदेश दिला.
आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात शिक्षे विरुद्ध आपिल दाखल केल्यामुळे सदर सोन्याचा वापर करता येणे शक्य नव्हते आणि त्यामळे 2012 पासून सदर मुखवटा त्याच सोन्यापासून परत बनविला जावा या आशेवर सर्व भाविक प्रतीक्षेत होते रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांनी या प्रकरणासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. रायगडच्या जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या निर्देश नुसार उपविभागीय अधिकरी श्रीवर्धन अमित शेडगे यांनी उच न्यायालयातील अतिरिक्त सरकारी वकील शिरकांत विठ्ठल गावंड यांचकडे मार्फत सदर गुन्ह्यात परत मिळविण्यात आलेल्या सोन्यापासून मूळ गणपतीच्या अर्धांग मुळवट्या सारखा मुखवटा बनवून तो पुन्हा दिवेआगर येथील गणेश मंदिरामध्ये ठेवण्याची परवानगी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला , दिनांक 21 मार्च 2021 रोजी सदर अर्जाची सुनावणी मुंबई उच न्यायालयातील न्यायाधीश रेवती मोहिते - डेरे यांच्या समोर झाली आणि सरकार तर्फे केलेली विनंती मान्य करून त्याच सोन्याचा वापर करन गणपतीचा अर्धांग मुखवटा तयार करण्याची परवानगी देण्यात आली सध्या हे सोने श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे यांच्या अधिपत्याखाली असून त्याचे पुणे येथील प्रसिद्ध सुवर्णकार पु. ना. गाडगीळ यांच्या पेढीमध्ये सुवर्ण गणेशाचा मुखवटा करण्याचे काम सुरु आहे व या सुवर्ण गणेशाच्या मुखवट्याची प्रतिष्ठापना सुवर्ण गणेशाचा प्रकट दिन 23 नोव्हेंबर 2021 या अंगारकी संकष्टी दिवशी असून याच दिवशी सुवर्ण गणेशाची पुनरप्रतिष्ठापना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याची घोषणा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी आज केली. या निर्णयाचे जोरदार स्वागत केले असून आता लवकरच गणपतीच्या अर्धांग मुळवट्याचदिवेआगर येथील गणेश मंदिरात पुन्हा प्रतिष्ठा पना होणार असल्याने नागरीकांमध्ये आनंद पसरला आहे. यामुळे दिवेआगर व पर्यायाने रायगडच्या पर्यटनाला अजूनही चांगली चालना मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे.