माथेरानचा अमन लॉज ते काळोखी रस्त्याचा उतार,चढाव ठरतोय जीवघेणा!
चंद्रकांत सुतार--माथेरान
माथेरान अमन लॉज ते काळोखी या भागातील चढण व उतार ठरतोय माथेरानला बाधक , सुरवाती पासूनच या रस्त्यावर तीव्रचढण व तेवढाच उतार असल्याने चालत येणे जाणे अथवा हात रिक्षा माल वाहतूक गाडी घोडे यांना त्रासदायक होते माथेरानच्या विकास मध्ये एमएमआरडीए (mmrda) मार्फत माथेरान मेन रोड पूर्ण विकसीत करण्यात येत आहेत सुरवातीलाच ह्याच काळोखी चढावा बाबत अनेकदा तक्रारी केल्या ,परंतु माथेरानकराना अपेक्षित असलेला त्या भागातील चढाव कमी करण्यात आलाच नाही
तसाच तो रस्ता पूर्ण होत गेला नव्याची नवलाई प्रमाणे सुरवातीला नवीन क्ले ब्लॉक रस्ता सुन्दर दिसला पण संपूर्ण रस्ता पांडे रोड पर्यंत पूर्ण होण्या अगोदरच मागील पूर्ण झालेल्या क्ले पेव्हर ब्लॉक गुळगुळीत होऊन गेले आहेत, त्यामुळे आता उतार भागात त्या वरून घोडे चालवणे जीकरीचे झाले आहे, माथेरानचे प्रमुख वाहन असलेले घोडा हे वाहन सध्या 450 च्या आसपास आहेत, सध्या पाऊस गेला असला तरी पहाटेचे दवबिंदू व येणाऱ्या मोसमात झाडांचे दव या मुळे तर ह्या काळोखी येथील उतारावर घोडे हमखास घसरणार
हल्लीच या भागात पर्यटकांना घेवून जात असताना व सोडून येत असताना येथील अश्वपालक निलेश ढेबे, जयेश कळंबे, राकेश कोकळे, सचिन पाटील, याचे घोडे घसरल्याने कंबरेला दुखापत झाली आहे, घोड्याच्या टाचेला लोखंडी नाल असल्याने अशा क्ले पेव्हर ब्लॉक रस्त्यावर उतार ठिकाणी घोडे घसरण्याचे प्रमाण जास्त असते, माथेरानला येण्या जाण्यासाठी प्रमुख महत्वचा रस्ता वर काळोखी भागात असाच तीव्र उतार चढ असल्याने तेथे हमखास घोडे घसरत आहेत त्यामुळे एक लाखाच्या आसपास असलेला घोड्याची किमतीतील घोडे अशा चुकीच्या धोरणामुळे गमवावा लागत आहे,तरी mmrda मार्फत सुरू असलेल्या ह्या कामाबाबत ह्या काळोखी चढावा बाबत आता तरी ठोस उपाय करण्याची गरज आहे .