Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

दुबई येथील उद्योजक फहद वाडेकर यांनी बज्म-ए-नूर फाउंडेशनची केली स्थापना

दुबई येथील उद्योजक फहद वाडेकर यांनी बज्म-ए-नूर फाउंडेशनची केली स्थापना

शैक्षणिक,सामाजिक आणि आरोग्य विषयक क्षेत्रात फौंडेशन करणार काम

            ओंकार रेळेकर-माणगांव


रायगड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा आखाती देशातील दुबई येथील उद्योजक  फहद वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली माणगाव तालुक्याशी जोडलेल्या लोणशी गावात बज्म नूर फाउंडेशन या सामाजिक, शैक्षणिक आणि कल्याणकारी संस्थेची स्थापना करण्यात आलीय आहे.  लोंशी गाव आणि परिसरातील शेकडो तरुणांचा समावेश असलेली ही संस्था विविध कार्यक्रमांवर काम करत आहे. युवकांना एका व्यासपीठावर आणून त्यांच्याकडून सकारात्मक कल्याणकारी, सामाजिक व राजकीय कार्य घेणे हा या संस्थेचा उद्देश आहे. या संस्थेच्या अंतर्गत जे मुख्य कामे करण्यात येणार आहेत ते सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय, क्रीडा, व्यवसाय इत्यादीचा लक्ष साकारण्यात आले आहे. ही संस्था अधिकृत रीत्या चालवावी म्हणुन  दिवसातच संस्थेची शासकीय नोंदणी सुरू होणार आहे.दुबईत राहून सामाजिक कार्यकर्ते फहाद वाडेकर आखाती देशांतील अनेक सामाजिक संस्थांशी जोडले गेले आहेत आणि त्यांना त्यांच्या गावी आणि कोकणात असाच अनुभव घ्यायचा आहे. या अगोदर लोंशी गावची बज्म-ए-नूर ही संस्था आपला शैक्षणिक व कल्याणकारी अजेंडा घेऊन काम करत होती,ठप्प झालेलं कार्य परत भरारी ने चालू करण्याच्या उद्देशाने बज्म नूर फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. ही संस्था नवीन मार्गाने आणि उच्च स्तरावर गावाव्यतिरिक्त कोकणातील परिसरात कार्य आयोजित करण्याच्या हेतूने केली जात आहे.या संस्थेकडून मोठ्या आशा आहेत.फहाद वाडेकर यांच्या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थांशी असलेल्या संपर्कामुळे या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चांगली आणि उच्च कामगिरी ही संस्था करेल ही आशा लोकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies