Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

विकास करताना जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही ही महाविकास आघाडीची भूमिका - उपमुख्यमंत्री ना. अजित पवार

 विकास करताना जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही ही महाविकास आघाडीची भूमिका - उपमुख्यमंत्री ना. अजित पवार 

                   विजय गिरी-श्रीवर्धन


कोकणात पर्यटन वाढीसाठी मुंबई गोवा हायवे लवकर व्हावा सर्वच प्रयत्न करत आहेत. विकासकाम करत असताना अनेक अडचणी येतात. महामार्गाच्या कामात अनेकांची घरे काढावी लागली त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली. विकासकाम करताना जनतेला वाऱ्यावर सोडायच नाही ही महाविकास आघाडीची भूमिका असल्याचं मत उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी व्यक्त केलं. दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मुखवटा प्रतिष्ठापना सोहळा प्रसंगी ते बोलत होते. 
                    
यावेळीव्यासपीठावर खा. सुनील तटकरे, पालकमंत्री ना.आदिती तटकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आ. भरत गोगावले, आ. अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, पोलीस अधीक्षक अशोक दुधे,  दिवेआगर सरपंच उदय बापट, ट्रस्ट अध्यक्ष महेश पिळणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 उपमुख्यमंत्री ना. अजित पवार व सौ सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते दिवेआगर सुवर्ण गणेश मुखवट्याची प्रतिष्ठापना झाली. यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना माननीय शरद पवार साहेबाना कोकण खूप आवडतो, मलाही कोकण खूप आवडतो त्यामुळे कोकणाला निधी मला देता येईल तितका देतो. मुख्यमंत्री तर कोकणाला निधी देण्यात आघाडीवर असतात. कोकणात होणारी उत्पादित पळ त्यापासून वाइन सारख काही करता येईल का याच प्रयत्न देखील प्रयत्न सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. यावेळी एस टी कर्मचाऱ्यांच्या संपावर भाष्य करताना आम्ही देखील तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहोत तुटेपर्यंत ताणू नका दोन पावलं आम्ही मागे जातो तुम्ही दोन पावलं मागे घ्या कुठल्याही आंदोलनाला नेतृत्व असायला लागत चर्चा कोणासोबत करायची ? आमची भावना आहे आमच्या गोरगरीबांच वाहन आहे. लवकर मार्ग निघाला पाहिजे त्यावेळी आ. अनिकेत तटकरे व पालकमंत्री आदिती तटकरे यांना कानपिचक्या देताना अजूनही कोरोनाच संकट गेलेलं नाही. इथे खूप जणांनी मास्क लावलेलं नाही. पालकमंत्री आणि अनिकेत माझं विना मास्कच  स्वागत करत होतेे. त्यांना म्हटलं जरा बापाचं शिका अस म्हणत मास्क लावण्याचा सल्ला दिला. 

      ना. आदिती तटकरे -  जलजीवन मिशन अंतर्गत १५०० पाणी पुरवठा योजना दिल्या आहेत. आज देखील दोन कोटीच्या पाणी पुरवठा योजनेच उद्घाटन संपन्न झालं. म वि अ मध्ये महिलांचा पाणी पुरवठा प्रश्न मार्गी लागणार आणि महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरण्याच काम महाविकास  आघाडी करणार असल्याचं आश्वासन ना. आदिती तटकरे यांनी यावेळी दिल. ना. अजितदादा यांच्या उपस्थित दिवेआगर सुवर्ण गणेश मुखवटा प्रतिष्ठापना कार्यक्रम झाला याचा सार्थ अभिमान ना. आदिती तटकरे यांनी व्यक्त केला. भविष्यात दुपटीने भाविक दिवेआगर ला येतील असा विश्वास देखील ना. आदिती तटकरे यांनी व्यक्त केला. 

खा. सुनील तटकरे- आजचा सोहळा म्हणजे अनन्य साधारण मंगलमय योग्य असून सुवर्ण गजाननाची स्थापना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  यांच्या उपस्थितीत होत आहे. कोकणच्या तिजोरीची चावी आदरणीय शरद पवार व अजितदादा पवार यांनी दिली मी अर्थमंत्री असताना कोकणचा केलिफोर्निया करण्याचं स्वप्न पाहिले होते. आता केलिफोर्नियाला देखील वाटेल कोकणात जन्माला यावं अस काम आम्ही करणार असल्याचं मत यावेळी खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं. कोरोना सारख संकट असताना पवार साहेबानी कोकण दौरा केला. आणि रोजगार हमी योजना पुन्हा लागू केली त्यामुळे कोकणचा जीवन पुन्हा एकदा उभारलेला पाहायला मिळत आहे. दिवेआगर सुवर्ण गणेश चोरी प्रकरणात सुरवातीची मधली पाच वर्षे अशीच वाया गेली. अस म्हणत आधीच्या सरकारवर निशाणा साधत मनी नाही भाव आणि देवा मला पाव अस होत नाही. त्यासाठी इच्छा शक्ती असली पाहिजे श्रद्धा असावी लागते तरच आजचा सुवर्णक्षण पाहायला मिळू शकतो अस म्हणत माजी गृहमंत्री स्व. आर आर आबा पाटील व पोलीस व ज्यांनी ज्यांनी या कामात योगदान दिले त्यांचे आभार कार्यक्रम प्रसंगी खा. सुनील तटकरे यांनी मानले.

मंत्री ना. उदय सामंत - कोविड कालावधीत महाविकास आघाडीने काय केलं कोकण वासीयांना माहीत असलं पाहिजे नुसत्या घोषणा केल्या नाहीत तर कोकणावर आलेल्या संकटात महाविकास आघाडी कोकण वासीयांच्या सोबत राहिली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब सढळ हस्ते कोकणाला देत आहेत असल्याचं मत ना. उदय सामंत यांनी व्यक्त केलं. 

यावेळी सुवर्ण गणेश चोरी नंतर पुनर प्रतिष्ठापने पर्यंत योगदान देणाऱ्याचा नागरी सन्मान करण्यात आला. यामध्ये सहायक धर्मदाय आयुक्त, डी वाय एस पी विशाल गायकवाड, सहायक पोलिस अधीक्षक संजय शुक्ला ऍड. प्रसाद पाटील, ए सी गावन, उप विभागीय अधिकारी अमित शेडगे तहसीलदार गोसावी दिघी सागरी पोलीस निरीक्षक पोमण पु ना गाडगीळ धर्मराज सोनके पी आय शेलार, विराज पाटील त्याचबरोबर दिवेआगर सुवर्ण गणेश चोरी प्रकरणात प्राण गमालेल्या सुरक्षा रक्षकांच्या पत्नी अनीती घडसी व उषा भगत याना देखील सन्मानित करण्यात आलं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies