थर्टी फर्स्टसाठी माथेरान पर्यटननगरी पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज!
पर्यटकांनी कोरोना संदर्भातील नियम पाळावेत प्रशासनाचे आवाहन
चंद्रकांत सुतार--माथेरान
मुबंई पुणे दरम्यान जवळचे असलेले थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणजे माथेरान, सध्या ख्रिसमस सुट्याचा आनंद घेऊन पर्यटकांचा ओघ हळूहळू माथेरानकडे सुरू झाला आहे ,कर्जत ठाणे येथून सर्वच महामार्गावर माथेरानकडे येण्यासाठी वाहनाची वर्दळ सुरू झाली आहे , माथेरान दस्तुरी वाहन तळावर येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्याची पार्किंगची नियोजन करण्यात स्थानिक कर्मचारीची लगबग सुरू आहे,
कोरोना काळात मागील दोन वर्षापासून नागरिकांना विविध सणाचा आनंद घेता आला नव्हता, शाळांना सुट्टी पडल्याने नागरिक पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत, सर्व पर्यटनास्थळांमध्ये वेगळे असलेल्या माथेरानमध्ये शुद्ध हवा मिनी ट्रेन येथील घोड्यावरील रपेट, येथील लाल मातीचे रस्ते , व हळूच मागून येऊन हातील खाद्यची पिशवी ओढून नेणारी येथील माकडे , तुम्हाला माथेरान कडे आकर्षित केल्या शिवास राहत नाही, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी येथील व्यावसायिकानी जय्यत तयारी केली आहे, येथील हॉटेल , लॉज धारक यांनीही आपले रूम परिसर नवनवीन रंगोटी करून आकर्षण विद्युत रोषणाई करत विकेडचे आकर्षक पॅकेज जाहिर केले आहेत. माथेरानच्या प्रवेश द्वारा जवळ पर्यटकांनी कोरोना नियम महसूल व पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे,नवीन वर्षाच्या सिझन नंतर जानेवारी ते एप्रिल महिन्या पर्यत सुट्टी शिवाय मोठे सिजन नाही त्यामुळे मागील कोरोनाकाळ विसरून येणाऱ्या नवीन वर्षात कोरोना विषयी शासनाने घालून दिलेल्या निर्देशानुसार थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षांचे स्वागत करावे असे आवाहन नगरपालिकेने केले आहे.