Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

क्रिप्टो करन्सी’ चा 80 हजार डॉलरचा डिजिटल दरोडा उघडकिस आणण्यास एलसीबीला यश

 'क्रिप्टो करन्सी’ चा 80 हजार डॉलरचा डिजिटल दरोडा उघडकिस आणण्यास एलसीबीला यश

 मिलिंद लोहार- सातारा

गेल्या महिन्यात चितळी, ता. खटाव येथे युवकाला अडवून त्याचे अपहरण करत त्याच्याकडून मोबाईल, लॅपटॉप, टॅब चोरत त्याद्वारे 80 हजार डॉलर की जे भारतीय चलनानुसार 64 लाख रुपयांवर दरोडा टाकणार्‍या 9 जणांच्या टोळीचा पर्दाफाश सातारा पोलिसांनी केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) ने केली असून अशा प्रकारचा क्रिप्टो करन्सीचा डिजिटल दरोडा उघडकिस येण्याची महाराष्ट्रातील पहिली घटना आहे.

किरण गुलाब गावित (वय 32, रा. विद्यानगर, कराड), बिरजू ऊर्फ सतीश विलास रजपूत ऊर्फ कांबळे (वय 38, रा. शांतीनगर, इचलकरंजी), विशाल ऊर्फ सागर हरीभाऊ ननावरे ऊर्फ गुरव (वय 29, रा. सोमंथळी, ता.फलटण), दुशांत मनोहर पांढरपट्टे (वय 31, रा. निपाणी जि. बेळगाव, राज्य कर्नाटक), अभिजित सुरेश खंडागळे (वय 35, रा. राधानगरी, जि. कोल्हापूर सध्या रा. निपाणी), प्रवीण बाळासो शेवाळे (वय 26, रा. घोगाव, ता. कराड), बाळू तुकाराम भोसले (वय 31, रा.दुर्गामाता चौक, इचलकरंजी), किशोर अंबादास निलंगे (वय 27, रा. शहापूर, इचलकरंजी), विशाल आनंदा शेवाळे (वय 30, रा. मलकापूर, ता. कराड) अशी संशयितांची नावे आहेत. यातील काही संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, याप्रकरणी ऋषीकेश राजेंद्र शेटे (रा. उंब्रज, ता. कराड) यांनी वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती अशी की, तक्रारदार ऋषीकेश शेटे व त्यांचा भाऊ हे दोघे क्रिप्टो करन्सीचे ट्रेडिंग करत असून हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. ही घटना दि. 19 डिसेंबर रोजी घडली आहे. तक्रारदार कारमधून आटपाडी येथून उंब्रजकडे येत असताना चितळी गावच्या हद्दीत संशयितांनी अडवले. संशयितांनी यावेळी मारहाण करत मोबाईल, टॅब, घड्याळ जबरदस्तीने हिसकावून घेतले. तसेच मोबाईल, टॅबचे पासवर्ड मागून घेत तक्रारदारांचे पाय बांधून त्यांना पुसेसावळी गावच्या हद्दीत सोडून दिले. तक्रारदारांनी स्वत:ची सुटका झाल्यानंतर घरी येवून ते व्यवसाय करत असलेल्या क्रिप्टो करन्सीचा व्हॅलेट युजर आयडी व पासवर्ड टाकून पाहिले असता त्यांच्या खात्यावर 80 हजार डॉलर (64 लाख) हे संशयितांनी दुसर्‍या व्हॅलेटवर ट्रान्सफर केल्याचे उघडकिस आले.

या घटनेनंतर तक्रारदारांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून एलसीबीच्या पथकाने तपासास सुरुवात केली. गेली चार रात्रंदिवस तपास सुरु असताना या प्रकरणातील 9 संशयितांना अटक करण्यास एलसीबीला यश आले. संशयित सर्वांना पुणे, कराड, इचलकरंजी, निपाणी येथून ताब्यात घेतले आहे. संशयितांनी घडलेल्या घटनेची कबुली दिली असून पोलीस संशयितांकडे अधिक चौकशी करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies