मुबंई पुणे एक्सप्रेसवे वरून टँकर कोसळला,
ब्रेक फेल झाल्याने 50 फूट कोसळला टँकर... दोन जण किरकोळ जखमी
दत्ता शेडगे-खालापूर
मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताची मालिका सतत सुरूच असून आज पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास एक्सप्रेस वेवरून टँकरचा ब्रेक फेल झाल्याने टँकर एक्सप्रेस वेवरून 50 फूट खाली जुन्या महामार्गावर कोसळला,सुदैवाने यातील चालक आणि क्लिनर बालबाल बचावले असून ते किरकोळ जखमी झाले आहे,
पुण्याहून मुबंई कडे टँकर जात असताना तो बोरघाट हद्दीत दत्तवाडी जवळ आला असता त्याचा ब्रेक फेल झाल्याने तो एक्सप्रेस वेवरून 50 फूट खाली कोसळला, टँकर हा रिकामा असल्याने मोठी जीवित हानी झाली नसून यातील दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत,
या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होत टँकर मधील अडकल्याना बाहेर काढून पुढीक उपचारासाठी पाठविण्यात आले