पेण तालुक्यातील वाशी परिसरात धमकी देत 17 वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्काराची अमानुष घटना घडल्याने खळबह उडाली आहे. याप्रकरणी 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर याप्रकरणातील आणखी 3 जण फरार असल्याची माहिती पीआय बाळा कुंभार यांनी दिली आहे. सदर नराधम या युवतीला धमकी देत दररोज आळीपाळीने करायचे बलात्कार करत असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधिक तपास करत आहेत.