Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कर्जत मधील आरोग्य सेवा कधी होणार सुदृढ

 कर्जत मधील आरोग्य सेवा कधी होणार सुदृढ

अभिनेते राहुल वैद्य यांचा सवाल

संजय गायकवाड-कर्जत


मुंबई -पुणे या दोन मोठ्या शहरांच्या मध्यवर्ती ठिकाण आणि तिसरी मुंबई म्हणून ज्याचा नामोल्लेख केला जातो असा कर्जत तालुका, या तालुक्यातील आरोग्य सेवा कधी सक्षम होणार असा प्रश्न कर्जत मधील रहिवाशी अभिनेते राहुल वैद्य यांनी सोशल मीडियावर उपस्थित केला आहे.

              कर्जत येथील ज्ञानदीप सोसायटी परिसरातील रहिवासी पण सध्या मुद्रे येथील नेमिनाथयेथे वास्तव्य असणारे अँड संदीप साळवी ह्यांचे दुःखद निधन झाले.वय अवघे 36 मृत्यूचे कारण हार्टअटॅक.त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि मुलगी,आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे.

            हे वय नक्कीच जाण्याचे नाही...हा धक्का त्यांच्या कुटुंबातील सगळ्यांना आहेच तसाच आपणा सगळ्यांसाठीही आहे. हे वय भविष्यातील कल्पना सत्यात उतरवण्यासाठी झगडण्याचे वय,ती उद्दिष्टे नजरेत भरून धावपळ करण्याचे वय,आई वडिलांनी मुलासाठी बघितलेले स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याचे वय,आई वडिलांबरोबर पत्नी आणि मुलीचे भविष्य मार्गी लावण्याचे वय,पण नियतीच्या एका फटक्याने सगळे उध्वस्त झाले.

                 खरं तर हा विषय अशा पद्धतीने मांडणे बरोबर नाही अशी खंत राहुल वैद्य यांनी व्यक्त केली पण आरोग्यव्यवस्थे वर प्रश्न उभा करणारा हा विषय आहे,

कर्जत सारख्या प्रगत आणि सेकंड होम साठी प्रसिद्ध असलेल्या गावी,केवळ वेळच्या वेळी चांगले उपचार मिळाले नाही आणि तशा प्रकारची उपचार व्यवस्थाच नाही ह्यामुळे एका होतकरू वकिलाचा मृत्यू अवघ्या 36 व्या वर्षी होतो हयासारखे दुर्दैव नाही.

              कर्जत मध्ये जी काही हॉस्पिटल झालीत ती अगदी अलीकडच्या काळात, उपजिल्हा रुग्णालयाच्या बाबतीत न बोललेच बरे, अगदी हाताच्या बाहेर गेले की मुंबई किंवा पुणे गाठा असे आजारी व्यक्तीच्या नातेवाईकांना सांगितले जाते.अशी कित्येक उदाहरणे आज मितीला कर्जत मधे झाली आहेत.त्यामुळे अनेक नागरिकांना त्यांच्या जीवाला मुकावे लागले आहे.

               माझा प्रश्न प्रशासन आणि आतापर्यंतच्या झालेल्या आणि आत्ताच्या असलेल्या लोकप्रतिनिधी यांना आहे. मग ते पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद किंवा आमदार, खासदार असोत.राजकारण करा पण ते आरोग्यव्यवस्थे मधे नको.चांगले हॉस्पिटल  त्यामध्ये सगळ्या अद्ययावत सुविधा , कोणतीही मोठी शस्त्रक्रिया तिथे होईल अशी उपकरणे व डॉक्टर, हे प्रत्यक्षात कधी साकार होईल.ह्याचे ठोस उत्तर मिळायला हवे.

कर्जत तालुक्यात जागा जमिनीचे दर वाढले पण त्या हिशोबाने आरोग्य सुविधांचे काय ?

              माझी सर्व पक्षाच्या नेत्यांना कळकळीची विनंती आहे की निदान ह्या प्रश्नासाठी तरी आपण सगळे एकत्र येऊ शकणार नाही का ?आरोग्य व्यवस्थेसाठी सुद्धा कर्जतचे नाव अग्रणी असावे असे उपाय आता करायला हवेत..तसे होईल का ?बघा विचार करून आणि आपणही व्यक्त व्हा...

तीच खरी श्रद्धांजली असेल संदीप साळवी ह्या तरुण वकिलाला अशी भावुक पोस्ट राहुल वैद्य  सोशल मीडियावर टाकली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies