Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

स्वच्छ, सुंदर पोलादपूर शहर भाजपाच्या विकासाचे व्हिजन ; प्रवीण दरेकर

 स्वच्छ, सुंदर पोलादपूर शहर भाजपाच्या विकासाचे व्हिजन ; प्रवीण दरेकर

             प्रकाश कदम-पोलादपूर


पोलादपूर नगरपंचायतीचा उर्वरित ४ जागांची निवडणूक १८ जानेवारी रोजी होणाऱ्  असल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भाजपाच्या ४ उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ पोलादपूर शहरात प्रचार फेरी घेऊन उमेदवारांना निवडून देण्यासाठी मतदारांना साकडे घातले.

       दरम्यान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पोलादपूर येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी स्वच्छ, सुंदर पोलादपूर शहर हेच, भाजपाच्या विकासाचे मुख्य व्हिजन असल्याचे सांगितले. यावेळी प्रामुख्याने पोलादपूर शहराच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन  शहरातील अंतर्गत रस्ते, गटारे,स्वच्छ पाणी,ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डन, बालकांसाठी बालउद्यान,स्ट्रीटलाईट्स आशा  विविध प्राथमिक गरजा शहराच्या विकासासाठी आवश्यक असून या गरजा भाजपाला संधी दिल्यास पूर्ण करून दाखवू असे आवाहन  करून पत्रकारांनी  विचारलेल्या विविध प्रश्नांचे समर्पक उत्तरे देत महामार्गाच्या वाहतूक कोंडीसह शहराच्या विकासाचे एक आगळे वेगळे व्हिजन पत्रकारांसोबत मांडतांना शहर कस असावं , शहराच्या प्राथमिक गरजा  काय असतात हे भाजपाला संधी दिल्यास दाखवून देऊ  असे आश्वासन दिले.

            दरम्यान सकाळी १०:३०  वाजता च्या सुमारास पोलादपूर नगरपंचायतिच्या चार जागांसाठी प्रभाग २  प्रभाग १० प्रभाग ८ प्रभाग १४ मध्ये निवडणूकीच्या रिंगणात उभे असणारे उमेदवार यांच्या प्रचारार्थ शहरातून रॅली काढून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.

        यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामूनकर,तालूका अध्यक्ष प्रसन्ना  पलांडे,शहरअध्यक्ष राजा दीक्षित, जिल्हा कार्यकारणी सदस्य राजन धुमाळ,माजी राजीप सदस्य अनिल नलावडे,महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी,महिला अध्यक्ष माई शेठ,कलिका अधिकारी आदींसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies