वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे कोरळवाडी आदिवासीवाडी मूलभूत सुविधेपासून वंचित
उद्यापासून आदिवासींचे उपोषण
अमूलकुमार जैन-अलिबाग
सदर निवेदनात कोरळवाडी येथील आदिवासी बांधव, ग्रुप ग्राम पंचायत आपटासह या परिसरात सामाजिक काम करणारी ग्राम संवर्धन सामाजिक संस्था ही स्वयंसेवी संस्था मागील पाच वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत ज्यामध्ये निवेदने, मोर्चे यांसह जागतिक आदिवासी दिनी पनवेल प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणा सारखी आंदोलनेही करण्यात आली ज्याची दखल घेत दोन वर्षापूर्वीच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी प्रश्नही विचारण्यात आला होता.
त्यानंतर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मार्फत तात्काळ सात लाख पन्नास हजार रुपयांचा निधी सदर रस्त्याच्या निर्मितीसाठी मंजूर करण्यात आली व ग्राम पंचायत आपटा आणि पनवेल पंचायत समितीमार्फत लागणाऱ्या जागेसाठी ३(२) चे प्रस्ताव वनपरिक्षेत्र पनवेल अधिकारी यांचेकडे सादर करण्यात आले परंतू वनविभागाकडून प्रत्यक्षात वस्तुस्थिती न पाहता वारंवार सदर प्रस्तावात त्रुटी काढण्यात आल्या तरिही ग्रामपंचायत व पंचायत समितीमार्फत वेळोवेळी संबंधित त्रुटींची पूर्तता करण्यात आल्या या शिवाय उप वन संरक्षक आशिष ठाकरे यांनाही अनेक वेळा प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा केला असता होईल,करतो अशी उत्तरे मिळाली ।
परंतु वन विभागाच्या अधिका-यांकडून आज तगायत संबंधित वाडीच्या ३(२) प्रस्तावास मंजुरी देण्यात आलेली नसल्याने मागील दीड वर्षांपासून सदर रस्त्याचा निधी पडून आहे याला सर्वस्वी जबाबदार निष्क्रिय वन विभागाचे अधिकारी आहेत त्यामुळे वन अधिकारी जाणीवपूर्वक कोरल वाडीतील आदिवासींना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा वन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर सेवा हमी कायदा व दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई करून सदर ३(२) च्या प्रस्तावास मंजुरी देण्यात यावी ह्या मागण्यांसाठी उप वनसंरक्षक रायगड जिल्हा यांच्या अलिबाग येथील कार्यालयासमोर मंगळवार दि. ११/०१/२०२२ पासून बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा ग्राम संवर्धन सामाजिक संस्था अध्यक्ष संतोष ठाकूर यांनी दिला आहे.