Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सामाजिक कार्यात अग्रस्थानी असलेल्या माणूसकी प्रतिष्ठानचा केला आमदार महेंद्र दळवी यांनी गौरव

 सामाजिक कार्यात अग्रस्थानी असलेल्या माणूसकी प्रतिष्ठानचा केला आमदार महेंद्र दळवी यांनी गौरव

          अमूलकुमार जैन-अलिबाग

रायगड जिल्हयासहित महाराष्ट्रात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या माणुसकी प्रतिष्ठान, जितनगर, महाराष्ट्र या संस्थेचा गौरव करीत माणुसकी प्रतिष्ठान हे नाव महाराष्ट्रासहित पूर्ण देशात व्हावे असे गौरवोद्गार अलिबाग मुरूड विधानसभा आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग तालुक्यातील राजमळा येथे काढले.

अलिबाग तालुक्यातील जितनगर या छोटयाशा गावात माणुसकी प्रतिष्ठान नावाचे रोपटे 2020 मध्ये  संस्थापकीय अध्यक्ष डॉ.राजाराम हुलवन यांनी त्यांचे सहकारी यांनी लावले.या रोपट्याने सामाजिक कार्यात अग्रेसर ठरली असून वैद्यकीय सेवा देण्यातही अग्रेसर आहे.

माणुसकी प्रतिष्ठानने  कोव्हिडं19 सारख्या महामारीत सुद्धा वैद्यकीय सेवा तसेच अन्न धान्य वाटप स्वच्छता,शैक्षणिक सारखे अभियान राबवून जंनताउपयोगी कार्य अविरतपणे करीत करीत आहेत.त्यांच्या या कार्यात त्याचे सहकारी माणुसकी कार्याध्यक्ष तानाजी आगलावे यांचेसुद्धा मोलाचे योगदान आहे.हा प्रतिष्ठानने गोरगरीब जनतेला फ़क्त दहा रुपयांत औषधेउपचार घेता यावे यासाठी अलिबाग आणि सांगोला जिल्हयात क्लिनिक सुरू करू त्यामाध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा केली जात आहे.प्रतिष्ठानने वृक्षारोपण करतेवेळी हजारोच्या संख्येने वृक्ष लागवड केली आहे.चक्रीवादळ आणि महाड ,पोलादपूर आणि मुरूड तालुक्यातील नागरिकांना साहित्य वाटप केले आहे.


  माणुसकी प्रतिष्ठान या संस्थेच्या तीन शाखेमध्ये सांगली, सांगोला व रायगड या  ठिकाणी कार्यरत असून गेले वर्षभर जे सामाजिक उपक्रम केलेत  त्याचा लेखाजोखा दिनदर्शिकेकच्या माध्यमातून जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.त्याचप्रमाणे माणुसकी प्रतिष्ठान या संस्थेच्या भविष्यात होणाऱ्या सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या.


 याप्रसंगी रायगड जिल्हा परिषद गटनेत्या मानसी दळवी, शैलेश महाडिक, संदीप परदेसी, पोलीस निरीक्षक गोविंद ओमसे, पुण्याचे समाजसेवक  दीपक कुंजीर, अपघातग्रस्तांच्या मदतीला संस्था खोपोली चे सदस्या भक्ती साठेलकर, माणुसकी कार्याध्यक्ष तानाजी आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते. माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ राजाराम हुलवान यांनी सर्वांचे आभार मानले. 

माणुसकी प्रतिष्ठान ही संस्था दरवर्षी नवनवीन सामाजिक उपक्रम राबवत असते यावेळीही नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुन्दर सुबक वर्षभराचे कॅलेंडर छापून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॅलेंडर  झोपडपट्टीवासी, आदिवासी तसेच गरजू गरीब वस्ती आहे अशा ठिकाणी  वाटण्यात येणार आहे अशी माहिती माणुसकी प्रतिष्ठान या अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवन यांनी सांगितले.

माणुसकी प्रतिष्ठानकडून कार्याध्यक्ष तानाजी आगलावे यांनी कॅलेंडर ची संपूर्ण माहिती दिली व माणुसकी उपाध्यक्ष सतीश कणसे,  कायदेशीर सल्लागार ऍड भूषण जंजीर, शिक्षण विभाग सदस्य संदीप वारगे व इतर माणुसकी सदस्य उपस्थित होते प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांनी सर्वांचे आभार मानले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies