Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

हरी भक्तीमध्ये रमलेल्या माऊलीच्या स्मरणार्थ दाभिळ येथे बांधले गेले तुळशी वृंदावन

 हरी भक्तीमध्ये रमलेल्या माऊलीच्या स्मरणार्थ दाभिळ येथे बांधले गेले तुळशी वृंदावन

 प्रकाश कदम-पोलादपूर


तालुक्यातील देवळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील वारकरी संप्रदायाचा वारसा असलेले दाभिळ गाव येथील गावच्या सुकन्या ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या वै. हरिभक्त परायण चंद्रकला नारायण दळवी यांच्या स्मरणार्थ गुरुवर्य केशव महाराज दळवी यांच्या शुभहस्ते मंदिराच्या समोर तुळशी वृंदावन बांधण्यात आले 

श्रीमती चंद्रकला दळवी यांचा जन्म दाभिळ गावी झाला लहानपणापासूनच परमार्थाची त्यांना आवड होती त्यामुळे गावातील सर्व सांप्रदायिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा हरिपाठ ठरलेला असे. विठ्ठल भक्ती मध्ये रंगलेल्या माऊलीच्या स्मरणार्थ  ग्रामस्थांनी त्यांचं तुळशीवृंदावन मंदिरासमोर बांधून त्यांच्या स्मृती जपल्या या कार्यक्रमासाठी गुरुवर्य हरिचंद्र महाराज मोरे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, गायनाचार्य प्रताप महाराज कुमठेकर, मृदुंग वादक कृष्णा मास्तर केसरकर, सरपंच बबीता दळवी ,माजी सरपंच प्रकाश कदम, निवृत्ती घाडगे, अनिल दळवी माजी ग्रामपंचायत सदस्य गणपत दळवी ,माजी सरपंच गुणाजी दळवी, व चंद्रकला दळवी यांचा परिवार तसेच दाभीळ येथील सुपुत्र श्री परशुराम गुरुजी मोरे तुकाराम गुरुजी मोरे,पांडुरंग मोरे सर तसेच दाभिल ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी कै. नामदेव मोरे यांच्या स्मरणार्थ आदर्श शिक्षिका प्राजक्ता मोरे यांनी सभागृहाला देणगी दिल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे बद्दल कृतज्ञता व्यक्त केली रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी आपल्या भाषणात दाभिळ गावच्या एक जुटी बद्दल गौरवोद्गार काढले जो गाव संघटित असतो त्या गावचा विकास झाल्याशिवाय राहत नाही म्हणूनच गावच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध असतो हे सांगून उर्वरित विकासासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू असे अभिवचन त्यांनी ग्रामस्थांना दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते अनिल दळवी यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies