Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

वैजनाथ देवस्थान मंदिराच्या जमीन व्यवहारात घोटाळा, चौकशी व्हावी : भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांची मागणी

 वैजनाथ देवस्थान मंदिराच्या जमीन व्यवहारात घोटाळा, चौकशी व्हावी : भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांची मागणी 

कर्जत येथे धरणे आंदोलन करत घोषणाबाजी 

नरेश कोळंबे -कर्जत 

   


   कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध शिव मंदिर असलेल्या वैजनाथ देवस्थान च्या जमीन व्यवहारात मोठा घोटाळा झाला असल्याचे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज शुक्रवारी कर्जत येथे सांगितले . सदर जमीन हस्तांतरण कामाची चौकशी लवकरात लवकर व्हावी अशी मागणी यावेळी किरीट सोमय्या यांनी केली.

कर्जत मधील वैजनाथ देवस्थान मंदिर हे अनेक वर्षापासून आपल्या  सुमारे 300 वर्षे पेक्षा अधिक पुरातन असलेल्या वैजनाथ देवस्थान च्या जमीन  हस्तांतरण प्रक्रियेत  संबंधित योग्य परवानग्या न घेता अहिंदू सलीम बिलाखीया या व्यक्तीच्या नावे जमीन केली गेली आणि त्यांनतर लगेचच त्या जमिनीचे हस्तांतरण अल्पावतीधितच श्रीधर पाटणकर यांच्याकडे गेले असल्याने या व्यवहारात पारदर्शकता नसून मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप  भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कर्जत येथे बोलताना केला. या  व्यवहारात घोटाळा झाला असून त्याची चौकशी व्हावी यासाठी आज शुक्रवार २८  रोजी भाजप नेते  माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली  ११ वाजता कर्जत येथील डी मार्टसमोर , किरवली गावाजवळ  तीव्र  निदर्शन करण्यात करण्यात आले . तसेच धरणे  आंदोलन ही  करण्यात आले . 

         यावेळी जमीन आमच्या देवाची,  नाही कुणाच्या बापाची , वैजनाथ जमिन घोटाळा चौकशी झालीच पाहिजे,  अश्या घोषणा देण्यात आल्या व ह्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असे निवेदन तहसीलदार विक्रम देशमुख यांना देण्यात आले. यावेळी   भाजपा कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, जिल्हा  सरचिटणीस दीपक बेहेरे , किसान  मोर्चा कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे ,जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, कर्जत तालुका सरचिटणीस संजय कराळे , युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद पाटील, कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे,  सचिन म्हसकर,   महिला मोर्चाच्या  स्नेहा गोगटे, नगरसेविका स्वामिनी मांजरे , सरस्वती चौधरी , बिनिता घुमरे , गायत्री  परांजपे, संदेश कराळे, मिनेश मसणे, केशव तरे,  मयूर शितोळे,  विजय कुलकर्णी , प्रभाकर पवार , अंकुश मुने,सर्वेश गोगटे  आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies