Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

पोलादपूर मध्ये वाघाची डरकाळी कायम ,सत्ता राखण्यात शिवसेनेला यश

 पोलादपूर मध्ये वाघाची डरकाळी कायम ,सत्ता राखण्यात शिवसेनेला यश

धक्कादायक निकालामुळे पक्षीय नेत्यांना आत्मपरीक्षण गरजेचे

भाजपच्या उमेदवारांना फुटला घाम

प्रकाश कदम-पोलादपूर 

 पोलादपूर नगरपंचायत च्या  निवडणुकीत पहिल्या टप्यात 71 टक्के तर दुसऱ्या टप्यात 86.28 टक्के मतदान झाले या मुळे परिवर्तनची शक्यता वर्तविण्यात येत होती मात्र ती फोल ठरत वाघाची डरकाळी यावेळस पुन्हा गरजल्याने पोलादपूर शहारवरची शिवसेनेची पकड घट्ट असल्याचे अधोरेखित झाले आहे मात्र शिवसेनेचे हक्काचे 3 बुरुज ढासळले असून शिवसेनेने 16 पैकी 10 जागांवर विजय संपादन केला आहे तर काँग्रेस ला 6 जगावर यश लाभले आहे भाजपने एक जागा मिळवत नगरपंचायत मध्ये शिरकाव केला आहे 

    पोलादपूर नगरपंचायत मध्ये खरी लढत शिवसेना विरोधात काँग्रेस आघाडी मध्ये झाली असून विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी प्रचार व शासनावर ओढलेला आसूड ने धक्कादायक निकाल लागला आहे मात्र 12 उमेदवार पैकी फक्त 1उमेदवार यांना मतदारांनी पसंती देत भाजप च्या आवाहन चा मान राखला आहे तर मनसेला पुन्हा मतदारांनी नाकारले मात्र भाजपाने घेतलेली मते पाहाता भविष्यात भाजपा निर्णयक ठरण्याची चिन्हे आहेत

      19 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्या पासून तहसील कार्यलयात मतमोजणीला सुरवात करण्यात आली होती या वेळी प्रातधिकारी प्रतिमा पुदलवाड , तहसील दीप्ती देसाई सह कर्मचारी याच्या उपस्थिती मध्ये मतमोजणी सुरवात करण्यात आली 

   पोलादपूर नगरपंचायतच्या दोन्ही टप्यात झालेल्या मतदान वेळी 4 हजार 799पैकी 3 हजार 670 मतदारानी आपला हक्क बजवला होता  या 17 जगासाठी 51 उमेदवार नशीब आजमावत होते या मध्ये शिवसेनचे 16 ,काँग्रेस 14 ,राष्ट्रवादी काँग्रेस चे 04 ,मनसे 03, भाजप 12 अपक्ष 1 , अखिल भारतीय सेना 1असे रिगणात होते  यापैकी शिवसेनेला 1 हजार 566 तर कॉंग्रेस ला 1 हजार 365 , राष्ट्रवादी काँग्रेस 172 ,भाजप 475 ,मनसे 50 व अपक्ष 13, आ भा से 2 मते मिळाली असून 27 जणांनी नोटा ला मतदान केले आहे 

     शिवसेनेने आपली सत्ता कायम राखली असली तरी माजी शहर प्रमुख सुरेश पवार ,माजी नगराध्यक्ष निलेश सुतार यांच्या पत्नी प्राची सुतार ,सारिका पालकर यांना पराभवाचा धक्का बसल्याने येणाऱ्या पाच वर्षात निर्णायक भूमिका घेणे क्रमप्राप्त बनले आहे 

    काँग्रेसने चांगली लढत दिली असली तरी माजी आमदार स्व माणिक राव जगताप याची उणीव यावेळी प्रचार दरम्यान जाणवली आहे  

     विरोधीपक्ष नेते दरेकर यांनी केलेल्या आवाहनाला मतदारांनी साथ दिली नसली तरी 1 उमेदवार निवडून आल्याने भविष्यात भाजप नगरपंचायत वर वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिसून येत आहे विद्यमान आमदार भरत  गोगावले त्यांनी नगरपंचायती वर भगवा फडकवला बद्दल मतदारांचे आभार मानले तसेच शिवसेनेला पुन्हा सत्ता मिळाल्याबद्दल शिवसेना हीच  विकास काम करू शकते ही कामे राहिलेत ती उर्वरित कामे येत्या पाच वर्षात पूर्ण करून पोलादपूरचा विकास काय असतो हे दाखवून देऊ नगरसेवकाने आपल्या प्रभागात जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्यावर लक्ष केंद्रित करा जो नगरसेवक योग्यरित्या काम करणार नाही त्याची पक्ष दखल घेईल असा इशाराही त्यांनी या निमित्ताने दिला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies