Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

म्हसळा नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता.काँग्रेस शिवसेना युतीने दिली राष्ट्रवादी काँग्रेसला कडवी झुंज.

 म्हसळा नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता.काँग्रेस शिवसेना युतीने दिली राष्ट्रवादी काँग्रेसला कडवी झुंज.

17 पैकी 13 जागा राष्ट्रवादी,काँग्रेस 2 आणि शिवसेना 2 जागांवर विजयी.

महाराष्ट्र मिरर टीम-म्हसळा 

म्हसळा नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस शिवसेना युतीच्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसने म्हसळा नगर पंचायतीवर एकहाती सत्ता प्रस्थापित करून गड कायम राखण्यात यश मिळवले आहे.काँग्रेस आणि शिवसेना युतीने राष्ट्रवादी काँग्रेसला कडवी झुंज देवुन दोन,दोन अशा चार जागा निवडुन आणल्या आहेत.दिनांक 21 डिसेंबर रोजी पार पडलेल्या 12 प्रभागातील आणि दिनांक 18 जानेवारी रोजी पार पडलेल्या 4 प्रभागातील निवडणूक मिळुन 16 जागांसाठी निवडणुक प्रकिया पार पडली होती तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये  राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज मंगेश म्हशीलकर या बिनविरोध निवडुन आल्या होत्या.16 प्रभागात पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 12 तर सेना काँगेसचे प्रत्येकी 2 असे 4 उमेदवारांनी विजय मिळवला आहे.निकालाचे दिवशी निवडनुक निर्णय  अधिकारी तथा प्रांताधिकारी अमित शेडगे,सहा.निवडणूक अधिकारी मनोज उकिर्डे यांनी निवडणूक प्रकिया सकाळी 10 वाजता वेळेत सुरू करून अवघ्या दीड तासात सर्व निकाल जाहीर केले.या कामी म्हसळा पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

म्हसळा नगर पंचायत निवडणुकीत प्रभाग निहाय प्रभाग क्रमांक - 1 मध्ये

कमळ रविंद्र जाधव - 55 ( राष्ट्रवादी)विजयी,काँग्रेस आय - कमळी पवार 37 मत,नोटा - 10,प्रभाग क्रमांक - 2 संजय यशवंत दिवेकर - 221 राष्ट्रवादी - विजयी,शिवसेना - प्रविण विनोद बनकर - 87 मताने पराभूत,प्रभाग क्रमांक - 3

राष्ट्रवादी - मेहजबिन नदीम दळवी - 231 (विजयी),शिवसेना - मिनाज शहजाद कादिरी - 60 पराभूत,प्रभाग क्रमांक - 5

राष्ट्रवादी - नौसीन सलीम चोगले - 197  विजयी,काँग्रेस आय - यास्मिन इम्रान मुंगये - 97  पराभूत,प्रभाग क्रमांक - 6

राष्ट्रवादी - असहल असलम कादिरी -225 - विजयी

काँग्रेस आय - जहुर हुर्झुक -160 - पराभूत,भाजप - 03 - पराभूत,प्रभाग क्रमांक - 7 राष्ट्रवादीच्या बशारत फरहीन अ.अझीज - 115 विजयी,काँग्रेस आय - पेणकर हीबा अब्दुल नईम - 68  पराभूत,इतर - 03,प्रभाग क्रमांक - 8 राष्ट्रवादी - सुमैय्या कासम आमदानी - 164  मतांनी विजयी,काँग्रेस आय - खतीब गुहेर मतीब - 100 - पराभूत

इतर - 01,प्रभाग क्रमांक - 9 राष्ट्रवादी - उकये अब्दुल रहीम शाहिद - 89 - पराभूत,काँग्रेस आय - डॉ.मुविझ शेख - 197 - विजयी,इतर -01,प्रभाग क्रमांक - 10 राष्ट्रवादी - मुबिन दाऊद हुर्झुक - 103 - पराभूत,काँग्रेस आय - सुफियान इकबाल हलदे - 106 - विजयी,इतर - 02,प्रभाग क्रमांक - 11-राष्ट्रवादी - म्हसलाई सारा अब्दुल कादिर - 160 - विजयी

काँग्रेस आय - करदेकर नाझीमा महमद - 108 - पराभूत

शेकाप - घरटकर अफरीन - 49 - पराभूत,प्रभाग क्रमांक - 12 राष्ट्रवादी - शाहिद सईद जंजिरकर - 127 विजयी

काँग्रेस आय - रविंद्र नामदेव दळवी - 126 - पराभूत,प्रभाग क्रमांक - 13 राष्ट्रवादी - कविता शितल बोरकर - 109 मत - पराभूत,शिवसेना - राखी अजय करंबे - 144 - विजयी,प्रभाग क्रमांक - 14 राष्ट्रवादी - संदिप रमेश बरटक्के - 01 - पराभूत

शिवसेना - अनिकेत दिलीप पानसरे - 57 - विजयी

भाजप - सचिन करडे - 43- पराभूत,अपक्ष - निकेश ओमप्रकाश कोकचा - 34 - पराभूत,प्रभाग क्रमांक - 15

राष्ट्रवादी - जयश्री चंद्रकांत कापरे - 74 - विजयी , शिवसेना -निता प्रसाद बोर्ले - 61 - पराभूत,भाजप - सरिता संतोष पानसरे - 49 - पराभूत,प्रभाग क्रमांक - 16

राष्ट्रवादी - संजय प्रभाकर कर्णिक - 327 - विजयी,शिवसेना - राजकीरण दत्ताराम खताते - 114 - पराभूत,भाजप - प्रसाद अशोक पोतदार - 19 - पराभूत,प्रभाग क्रमांक - 17

राष्ट्रवादी - सुनिल गणपत शेडगे - 280 - विजयी,भाजप - शरद हिरामण चव्हाण - 61 - पराभूत

शिवसेना - मिथुन चांदोरकर - 46 - पराभूत अशा प्रकारे मतदान झाले आहे.

प्रभाग क्रमांक 9 आणि 10 मध्ये काँग्रेसने आपल्या जागा राखण्यात यश प्राप्त केला आहे येथे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. मुविज शेख यांनी राष्ट्रवादीचे खंदे कार्यकर्ते शाहिद उकये यांचे  चिरंजीव अब्दुल उकये यांचा मोठया फरकाने पराभव केला आहे.हा पराभव राष्ट्रवादीचे जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये काँग्रेसच्या सुफीयान हलदे याने राष्ट्रवादीचे मुबिन हुर्जुक यांचा अवघ्या तीन मतांनी पराभव केला आहे तर प्रभाग क्रमांक 12 मध्ये राष्ट्रवादीचे शाहिद जंजिरकर यांनी काँग्रेसचे तालुका सचिव रविंद्र दळवी यांचा अवघ्या एका मताने पराभव केला आहे.या ठिकाणी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली होती.

म्हसळा नगर पंचायती मध्ये झालेला विजय खासदार,पालकमंत्री आणि पक्ष कार्यकर्त्यांना समर्पित-आमदार अनिकेत तटकरे


म्हसळा नगर पंचयतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी खासदार सुनिल तटकरे,पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आमदार अनिकेत तटकरे यांचेवर जबाबदारी दिली होती त्या नुसार म्हसळा शहरात मागील पाच वर्षे केलेल्या विकास कामांवर विश्वास टाकुन मतदारांनी म्हसळा नगर पंचायतीची सत्ता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात दिली या विजयाचा आनंद आणि निवडुन आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन आमदार अनिकेत तटकरे  यांनी केले.या वेळी त्यांनी मनोगत व्यक्त करताना हा विजय खऱ्या अर्थाने खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे आणि पक्ष कार्यकर्त्यांना समर्पित करीत असल्याचे सांगितले.

मतदार आणि पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानताना आमदार अनिकेत तटकरे यांनी खरंतर म्हसळयात राष्ट्रवादी 17/0 ने विजयी होणे अपेक्षित होते.4 ठिकाणी काही कारणास्तव थोडया मोठ्या फरकाने राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले आहेत तरीही या विजयाचा मोठा गाजावाजा न करता पक्षाचे ज्या ठिकाणी उमेदवार पराभूत झाले आहेत तेथील चुका सुधारून पक्षात गद्दारी केलेल्याना थारा दिला जाणार नसल्याची तंबी दिली.म्हसळा शहरातील विकासाला अधिक गती मिळण्यासाठी निधीची कमतरता पडु देणार नसल्याचे आमदार अनिकेत तटकरे यांनी ग्वाही दिली आणि सर्वांचे आभार मानले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies