Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

खासदार तटकरे कोकणचे भाग्यविधाते नसून कुटुंबियांचे,नातेवाईकाचे.आम.भास्कर जाधव यांची बोचरी टीका.

 खासदार तटकरे कोकणचे भाग्यविधाते नसून कुटुंबियांचे, नातेवाईकाचे. आम.भास्कर जाधव यांची बोचरी टीका.

          किशोर पितळे-तळा


तळा नगरपंचायतीच्या चार जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीचा प्रचार जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी मतदारांना संबोधित करताना म्हणाले कि.खासदार तटकरे हे कोकणचे भाग्यविधाते नाही तर सगे सोयरे कुटूंबियाचे भाग्यविधाते आहे त अशी बोचरी टीका आम.भास्कर जाधव यांनी यावेळी केली.व्यासपीठावर भरतशेठ गोगावले(महाड पोलादपुरआमदार)माजी जिल्हा प्रमुख प्रमोदजी घोसाळकर द.जिल्हा प्रमुख अनिलजी नवगणे तालुका प्रमुख प्रद्धूम्न ठसाळ, माजी उपनगराध्यक्षा सायली खातू, शहरप्रमुख राकेश वडके शिवसैनिकडॉ. मनोज पाथरे लिलाधर खातू,महीला संघटक स्मिता पाडळकर,उपसंरपच नाना दळवी शिल्पा चोरगे नमीत पांढरकामे उपस्थित होते.त्यापुढे म्हणाले की शिवसेना हा पक्ष नसून संघटना आहे मोठी ताकद आहे.स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशा प्रमाणे ८०%समाजकारण २०%राजकारण करते.सेनेने १७जागांवर उमेदवार उभे केले असून एक जागा बिनविरोध निवडून आली हि विजयाची नांदी आहे.उरलेल्या१२जागांवर देखील विजय होणार याची खात्रीअसून ४जागेसाठी होत असलेल्या उमेदवारांना विजयी करून पुन्हा नगरपंचायतीवर भगवा फडकवा.

भावनिक आवाहन करून शहराच्या नियोजनबध्द विकास केला जाईल असे आश्वासन दिले. महाराष्ट्रात काम करण्यासाठी मला कोणत्या जिल्ह्याची निवड करायची झाली तर मी रायगड जिल्ह्याची निवड करेन.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला संघटनात्मक काम करण्यासाठी रायगड जिल्हा दिला तर मग मी माझी ताकत दाखवतो असा ईशारा आमदार भास्कर जाधव यांनी खा. सुनील तटकरे यांचे नाव न घेता दिला.विजयी सभेला आमंत्रीत केले तर जरूर येईन. असे देखील पदाधिकाऱ्यांनासांगितले.भाजपबांडगुळा सारखा शिवसेनेच्या ताकदी वर वाढणारा पक्ष आहे गल्ली पासून दिल्ली पर्यंत शिवसेनेने भाजपला मोठे केले.आणी गद्दारी केली याचा अर्थ छुप्या पध्दतीने खंजीर खुपसते भाजप लबाड पक्ष आहे अशी जहर टीका केली.खा.तटकरे स्वतःला कोकणचेभाग्यविधाते म्हणवितात मग त्यांना घरोघरी जाऊन मते मागण्याची वेळ का येते.तुम्ही जर जनतेची कामे केली असतील तर जनता तुम्हाला निवडून देईल परंतुकेवळआश्वासन देऊन मते मिळतनाहीत त्यासाठी जनतेची कामे करावी लागतात.असा टोला आमदार. गोगावले यांनी खा.सुनीलतटकरे यांना लगावला.तसेच तळा, म्हसळा, माणगाव, पोलादपूर नगरपंचायतीवर शिवसेनेचीच सत्ता येईल असा विश्वास देखील आ. भरत गोगावले यांनी यावेळी व्यक्त केला.भाजप प्रदेश सचिव यांनी मुलाला पक्षाच्या चिन्हावर उभ न करता अपक्ष म्हणून उभे केलेयावरून काय ते समजून जा.त्यांची निशाणी कपबशी असून धनुष्यबाणाने कपबशी फोडून टाका असे भावनिक आवाहन केले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies