खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते विविध पाणी पुरवठा योजनांचे भूमिपूजन
सागर जैन -रोहा
रायगड जिल्हा रोहा तालुका तांबडी, वराठी येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना तांबडी ग्रामपंचायत कार्यालय आज .दिनांक 15 जानेवारी 20 22 रोजी उद्घाटन व विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी तांबडी ग्रामस्थांनी खासदार सुनील तटकरे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमास सुरुवात झाली .यावेळेस खासदार तटकरे म्हणाले की जनतेने काम सांगावे आणि आम्ही ती पूर्ण करून जनतेस समर्पित करावी.कार्याध्यक्ष मधुकर पाटील यांचेही भाषण झाले.
यावेळेस कार्यक्रमास तांबडी नव्याने रुजू झालेल्या सरपंच सौ दळवी , विनोद भाऊ पाशिलकर ,कार्याध्यक्ष मधुकर पाटील ,माजी सभापती हेमंत कांबळे ,उद्देश वाडकर ,किरण मोरे ,चंद्रकांत पारटे ,अशा सर्व कार्यकर्त्यांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला