Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची येथील लोकांनी खूप प्रयत्न केले, हा बंधारा त्यांच्या प्रयत्नांचे फलित आहे, आमदार महेंद्र दळवी यांचे प्रतिपादन

 धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची येथील लोकांनी खूप प्रयत्न केले, हा बंधारा त्यांच्या प्रयत्नांचे फलित आहे, आमदार महेंद्र दळवी यांचे प्रतिपादन 

             अमूलकुमार जैन-अलिबाग


 बोर्ली येथे बांधण्यात येणारा धूप प्रतिबंधक बंधारा यासाठी येथील लोकांनी खूप प्रयत्न केले. त्यामुळे हा बंधारा म्हणजे त्यांच्या प्रयत्नाचे फलित असल्याचे प्रतिपादन आमदार महेंद्र दळवी यांनी केले.

 बोर्ली येथे धूप प्रतिबंधक बंधारा भूमिपूजन धूप प्रतिबंधक बंधारा याच्या भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते.   यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्या राजश्री मिसाळ,उपजिल्हा प्रमुख प्रशांत मिसाळ,लुका प्रमुख ऋषींकांत डोंगरीकर, तालुका महिला संघटीका शुभांगी करडे,युवती संघटिका सिद्धाई भोसले,माजी सरपंच नौशाद दळवी,सामाजिक कार्यकर्ते अजय सोडेकर, सहित आदी मान्यवर उपस्थित होते.

          समुद्रातील खार पाणी रोखण्यासाठी तसेच येथील समुद्री वाळू आदींची धूप रोखण्यासाठी धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्यात येतात. मुरुड तालुक्यातील बोर्ली येथे धूप प्रतिबंधक बंधारा बांधला जावा अशी मागणी करण्यात येत होती. त्यासाठी २०१४ ला ७३० मिटर बंधाऱ्याची मागणी मछिंद्र मुरुडकर व राजा सोडेकर यांनी केली होती.  त्याला मंजुरी मिळून कार्यारंभ आदेश हे ३५७ मीटरची निघाले. तर त्यासाठी ४ कोटी २४ लाख रुपयांची तरतूद देखील करण्यात आली.  उपअभियंता नसल्याने काम रखडले होते. तर गेले २ वर्ष स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून माजी सरपंच नौशाद दळवी व राजा सोडेकर यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे हे काम पूर्णत्वास येत आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला असून आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना आमदार दळवी म्हणाले कि अलिबाग मुरुड या माझ्या मतदारसंघातील दोन्ही तालुके हे पर्यटनाचे तालुके आहेत. येथे अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्न आहे, त्यात स्थानिक मच्छिमार यांचा प्रश्न मोठा आहे. हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. त्यातील अनेक प्रश्न सोडवले देखील आहे. मात्र येथील समस्यांचा मला कायमचा बंदोबस्त करायचा आहे. लोक माझ्यासाठी मोठी आहेत. त्यांनी मला निवडून दिल आहे, त्यामुळे दिलेले शब्द पाळण्याचा मी अतोनात प्रयत्न केला आहे. राज्यात आपली सत्ता आहे तेव्हा विकासकामातून लोकांना सामोरं जा. असा सल्ला देखील आमदार यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना दिला. तर ताराबंदर यासाठी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्याचा शब्द देखील त्यांनी यावेळी दिला .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies