Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

पोलादपूर नगरपंचायत एकूण मतदान 86.28 टक्के

पोलादपूर नगरपंचायत एकूण मतदान 86.28 टक्के

            प्रकाश कदम-पोलादपूर


पोलादपूर नगरपंचायतसाठी आज मतदान पार पडलं दिवस अखेर एकूण 86.28 टक्के मतदान झालं.

शिवसेनाला सत्ता राखण्यात यश मिळणार की सत्तेची खुर्ची हुलकावणी देणार?

 काँग्रेस आघाडीला परिवर्तनाची आशा !

पोलादपूर नगरपंचायतची निवडणूक प्रकिया पार पडली असल्याने 19 जानेवारी होणाऱ्या मतमोजणी कडे सर्वच पक्षाचे लक्ष लागले आहे शिवसेनेला विजयाची व पुन्हा सत्ता मिळविण्याचा आत्मविश्वास आहे तर काँग्रेस आघाडी ला परिवर्तन होणार असल्याची आशा वाढीस लागली आहे मतदार वर्गाला भाजप च्या रूपाने या वेळेस पर्याय मिळाल्याने किती मते घेतात या कडे इतर पक्षाचे लक्ष लागून राहिल्याने धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता राजकीय विश्लेषक यांनी वर्तवली आहे

     पोलादपूर ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाल्या नंतर पहिल्या पंचवार्षिक निवडणूक मध्ये मतदारांनी शिवसेनेवर विश्वास दाखविला होता मात्र 5 वर्षात मतदार शहर वासीयांना नगराध्यक्ष पदाच्या संगीत खुर्चीचा खेळ सह मुख्याधिकारी विना कामकाज हे पाहवायस मिळाले पहिली अडीच वर्षे 2 महिलांना नगराध्यक्ष पदाची संधी देण्यात आली या नंतर दुसऱ्या अडीच वर्षात तीन नगरसेवक यांना संधी देण्यात आली त्याच वेळी कोरोनाचा शिरकाव ने अनेक कामांना ब्रेक लागला होता 5 वर्षात हवा तसा विकास साधता आला नसला तरी कोट्यवधी रुपयांची विकास कामे झाल्याचा दावा या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रचार दरम्यान सेनेकडून करण्यात आला महाड पोलादपूर माणगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत शेठ गोगावले व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी पोलादपूर शहरात ठाण मांडून निवडणुकीची सूत्रे आपल्या हातात घेतली होती त्यामुळेच सत्ता आमचीच असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे  17 पैकी 16 जागा निवडून येणार असल्याचे विश्वास शिवसेनेच्या वतीने करण्यात येत असल्याने गुलाल आमचा असल्याचा निर्धार कार्यकर्ते यांनी व्यक्त केला

     पाच वर्षात शहरातील मूलभूत सोईसुविधा पूर्ण न करता आल्याने व पोलादपूर शहराला शहराची ओळख निर्माण करून देण्यात सत्ताधारी पक्ष अपयशी ठरल्याचे सांगत कॉंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ने लोकाभिमुख विकास कामे करण्याची आश्वासने दिली विकास कामात 5 वर्षे अपयशी ठरलेल्या सत्ताधारी याच्यावर मतदारराजा नाराज असल्याने परिवर्तन होणार असल्याचा आशावाद आघाडी च्यावतीने करण्यात येत आहे काँग्रेस ने 14 तर राष्ट्रवादी काँग्रेस ने 4 जागा लढवल्या आहेत विकासाचा चेहरा म्हणून माजी सभापती व काँग्रेस चे दिलीप भागवत याचे नाव पुढे करत दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत निकालानंतर सर्व सूत्र दिलीप भागवत याच्या हातात देणार असल्याने परिवर्तन ची शकता वर्तविण्यात येत आहे 

    भाजप ने या वेळेस दमदार उमेदवार उभे केल्याने शिवसेना सह काँग्रेस आघाडी याच्या कोणत्या उमेदवार यांना फटका बसणार असल्याचे दबक्यात चर्चिले जात आहे त्यातच पहिल्या टप्यात झालेल्या मतदान नंतर दुसऱ्या टप्यात भाजप तर्फे जोरदार प्रचार व रणनीती आखण्यात आली होती भाजपाचे तालुका अध्यक्ष प्रसन्ना पालांडे हे स्वताच निवडणूक लढवत असल्याने भाजपालाही येथे परिवर्तनाची आशा आहे सत्तेत कोणत्याही प्रकारे शिरकाव करायचा हा निर्धार करूनच भाजपाने रणनीती आखली होती महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी स्वतः जातीने लक्ष घातले होते त्यामुळे निकालाची प्रतिक्षा सर्वांनाच लागून राहिले आहे भाजप ने उभे केलेले उमेदवार याच्यामुळे या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे 

      

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies