पेण को ऑपरेटिंव्ह अर्बन बँक ठेवीदारांच्या स्वाक्षरी मोहिमेस कर्जत उत्स्फूर्त प्रतिसाद.
संजय गायकवाड-कर्जत
गेल्या 10 ते 11 वर्षांपासून पेण को ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे खातेदार आणि ठेवीदार त्यांचे पैसे परत मिळावे यासाठी विविध मार्गातून लढा देत आहेत परंतु अजून या लढ्याला यश आलेले नाही. म्हणून भाजपचे नेते सुनिल गोगटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिल्ली येथे केंद्रिय अर्थमंत्री अनुराग ठाकूर आणि डॉ. भागवत कराड यांची भेट घेऊन खातेदार आणि ठेवीदारांना लवकरात लवकर पैसे मिळावे यासाठी निवेदना द्वारे मागणी केली होती, त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद सुध्दा दिला. आता नव्याने झालेल्या कायद्या प्रमाणे 5 लाखाच्या ठेवी पर्यत ठेवीदारांना संरक्षण देण्यात आले आहे. त्याचे आधारे पेण को ऑप अर्बन बँकेच्या ठेवीदारांना संरक्षित करून ठेवीदारांना त्यांचे पैसे परत द्यावे यासाठी ठेवीदारांची स्वाक्षरी मोहीम आंदोलन कर्जत मधील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकात सुरू करण्यात आले, त्यास खातेदार आणि ठेवीदारांनी उस्फुर्त प्रतिसाद देत स्वाक्षऱ्या केल्या.
ही मोहीम रायगड आणि मुंबई येथील शाखा असलेल्या शहरात राबविण्यात येणार असल्याचे भाजपचे नेते सुनील गोगटे यांनी सांगितले. याप्रसंगी संजय कराळे बळवंत घुमरे, प्रकाश पालकर, मयूर शितोळे, स्नेहा गोगटे, प्रीती तिवारी, विजय कुलकर्णी, श्रीनिवास राव, दिनेश गणेगा, सर्वेश गोगटे, सूर्यकांत गुप्ता, रजनी वैद्य, समीर सोहोनी, सागर खडे, संगीता गोडबोले, दीनु वैद्य आदी सह जेष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.