Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

शिवसेनेच्या प्रचार रॅलीला पालीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

शिवसेनेच्या प्रचार रॅलीला पालीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

              विनोद भोईर-सुधागड


 पाली नगरपंचायतीच्या उर्वरित चार जागांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून शिवसेनेने देखील चार पैकी तीन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. १३ जानेवारी रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत पाली शहरातून जोरदार प्रचार सभा व प्रचार रॅलीचे आयोजन केले होते. या प्रचार या रॅलीला पाली शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून पाली नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचे चित्र शिवसेनेच्या प्रचार रॅलीतून पाहायला मिळाले. तसेच यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी प्रभाग क्रमांक २ कल्याणी संदीप दपके, प्रभाग क्रमांक ५ जागृत जैन, व प्रभाग क्रमांक ८ निखिल शहा या उमेदवारांची भेट घेऊन उमेदवार व कार्यकत्यांसह पाली शहरात प्रचार रॅलीच्या माध्यमातून शिवसेना पक्षाचा प्रचार केला.

यावेळी आमदार महेंद्र दळवी म्हणाले की, जिल्ह्यातील सहा ही नगरपंचायतीचे वातावरण अनुकूल असल्याचे चित्र दिसत आहे. म्हणून ही निवडणूक तुमच्या आमच्या अस्तित्वाची लढाई आहे. पाली शहरातील पाणी, रस्ते असे अनेक समस्यांचे निवारण करण्याचे ध्यास शिवसेनेने घेतला असून येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या पाली नगरपंचायत ही दत्तक घेण्याचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने शब्द,आ. महेंद्र दळवी यांनी पालीकरांना न.पं. दत्तक घेण्याचा दिला शब्द

 शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देशमुख, माजी जिल्हाप्रमुख विष्णू पाटील, तालुकाप्रमुख मिलिद देशमुख, सभापती रमेश सुतार, विभाग प्रमुख किशोर दिघे, अनुपम कुलकर्णी, संजय म्हात्रे, शहर प्रमुख दादू गोळे, दिनेश चीले, हुले काका, तसेच युवा सेना तालुका अधिकारी सचिन डोबले, उपतालुका अधिकारी किरण पिंपळे, कुंभारशेत उपसरपंच किशोर खरीवले, तालुका चिटणीस मनोज भोईर, निखिल शहा, जागृत जैन, विदेश आचार्य, शहर सरचिटणीस निखिल खामकर, वितेज पाटील आदींसह शिवसैनिक व युवासैनिक यावेळी उपस्थित होते.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies