ज्ञानदा समीर भोसले हिची शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागातून जिल्हा गुणवत्ता यादीत निवड
कुलदीप मोहिते- कराड
शिवडे ता.कराड गावची कन्या अण्णासाहेब कल्याणी हायस्कूल सातारा येथील विद्यार्थिनी कु.ज्ञानदा समीर भोसले हिची इयत्ता पाचवीमध्ये घेतल्या जाणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागातून जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. ज्ञानदाने आजपर्यंत विविध स्पर्धात्मक परीक्षा ,वकृत्वस्पर्धा यांमधून सातत्याने आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे
ज्ञानदानाच्या यशामागे तिचे वर्गशिक्षक काटकर सर मार्गदर्शक शिक्षक विरकर सर ,गाडे मॅडम, मुख्याध्यापक श्री नागपुरे साहेब ( सचिव रयत शिक्षसंस्था )तसेच तिचे आई-वडील ,आजी व कुटुंबातील इतर सदस्य या सर्वांचे परिश्रम आहेत. गुणवत्ता यादीत आल्याबद्दल ज्ञानदाचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. ज्ञानाच्या या अलौकिक यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.