Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

आदर्श शिक्षक खेमसिंग चव्हाण यांचे निधन

 आदर्श शिक्षक खेमसिंग चव्हाण यांचे  निधन 

शिक्षक चव्हाण यांचे शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान

श्याम लोखंडे -कोलाड


रायगड जिल्हा प्राथमिक आदर्श शाळा येरळचे मुख्याध्यापक तसेच लोकप्रिय असलेले आदर्श शिक्षक खेमसिंग हिराचंद चव्हाण यांचे वयाच्या 51 व्या वर्षी आकस्मिक दु:खद निधन झाल्याने विद्यार्थी, शिक्षक, असंख्य चाहते आणि नातेवाईक यांना मोठा धक्का बसला असून अनेकांना अश्रू अनावर होत असून सारेच दुखाच्या छायेत आहेत तर रोहा तालुक्यातील एक होतकरू आणि शैक्षणीक क्षेत्रात उल्लेखनीय असे काम करणारे तसेच आपल्या शाळेचा नाव उंच स्तरावर नेऊन ठेवणारे शिक्षक चव्हाण यांचे निधन झाल्याने शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

  खेमसिंग चव्हाण यांचे शिक्षण बी.ए. बी.एड. होते. ते 20 जून 1995 ला सेवेत रुजू झाले. गौळवाडी, पहुर या प्राथमिक शाळेत यशस्वी सेवा केल्यानंतर सन 2010 पासून येरळ ( ता. रोहा ) या प्राथमिक शाळेत त्यांचा सेवाकाळ सुरु झाला. त्यांनी गौळवाडी  पहुर या शाळेप्रमाणे येरळ प्राथमिक शाळा बोलकी केली. एवढेच नाही तर या शाळेला  पहिला आय.एस.ओ. मानांकन मिळवून देण्याचा त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या प्राथमिक शाळेतून सातवी पास होऊन हायस्कूल ला जाणारा विद्यार्थी हा परिपूर्ण आणि हुशार असायचा त्यांनी त्यांच्या शाळेला आदर्श शाळा असे नामांकन मिळविण्यास यश प्राप्त केले.

चव्हाण यांनी स्वतः मेहनतीने तयार केलेला " पपेट शो " अत्यंत गाजला. त्यांनी एका चित्र फितीची निर्मिती ही केली होती. हुशार व्यक्तीमत्व असलेल्या खेमसिंग चव्हाण यांनी शैक्षणिक साहित्या बरोबर दगड आणि  लेडीडॉन या कथा चित्रपटासाठी लिहिल्या होत्या. मात्र त्यांच्या आकस्मित जाण्याने चित्रपट अपुरे राहिले. दरवर्षी प्रमाणे विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जाते त्यांनी या विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक कधीही सोडला नाही. धारदार आवाज, शिस्तप्रिय, सतत नवीन शैक्षणिक साहित्य निर्माण करण्याची धडपड तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व त्यांच्या बुद्धिमत्तेला वाव मिळावा यासाठी ते नेहमी अथक परिश्रम घेत असत तसेच सर्वांना आपल्या बरोबर घेवून जाणाऱ्या खेमसिंग चव्हाण यांचे मुळगाव नागणसूर (भवानीतांडा ), ता. अक्कलकोट , जि.सोलापूर असे होते. रोहा तालुक्यात त्यांची 27 वर्षे सेवा केली आहे. हुशार व्यक्तीमत्व असल्यामुळे बंजारा समाज आणि शैक्षणिक क्षेत्राने त्यांच्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या टाकल्या होत्या. ते पहुर (ता. रोहा ) येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, मुलगी भाऊ असा परिवार आहे. खेमसिंग चव्हाण यांच्या अचानक निधनाने शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील अनेकजण शोककुल झाले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies