पोलादपूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी सोनाली गायकवाड तर उपनगराध्यक्षपदी नागेश पवार
प्रकाश कदम-पोलादपूर
पोलादपूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने 10 प्रभागांमध्ये विजय मिळवून आपले वर्चस्व दाखवून दिले. गुरुवारी पोलादपूर नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पीठासीन अधिकारी स्नेहा उभाळे यांच्या उपस्थितीत पार पडल्यानंतर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सोनाली प्रकाश गायकवाड तर उपनगराध्यक्षपदी नागेश पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे त्यामुळे सर्वच स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.नवनिर्वाचित नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांना आमदार भरत गोगावले, रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी पोलादपूर शहराचा विकासाच्या दृष्टीने वाटचाल करून कायापालट करून जास्तीत जास्त योजना व विकास कामे करू असे यावेळी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी आश्वासन दिले.
यावेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक मनोज प्रजापती, प्रसाद इंगवले ,सिद्धेश शेठ ,विनायक दिक्षित,सुनीता पार्टे,शिल्पा दरेकर,अस्मिता पवार, स्नेहा मेहता, तालुका प्रमुख निलेश अहिरे,शिवसेना शहर प्रमुख सुरेश पवार ,माजी नगराध्यक्ष अश्विनी गांधी, ज्येष्ठ शिवसैनिक मंगेश नगरकर ,उपशहर प्रमुख राजन पाटणकर, आजी-माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते,काँग्रेस पक्षाचे नगरसेवक ,भाजप नगरसेवीका यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या