Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

माणगांव नगरपंचायती मध्ये शिवसेनेची सत्ता स्थापन; नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार तर उपनगराध्यक्ष सचिन बोंबले

 माणगांव नगरपंचायतीत शिवसेनेची सत्ता स्थापन; नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार तर उपनगराध्यक्ष सचिन बोंबले

रविंद्र कुवेसकर -माणगांव

माणगांव नगरपंचायतीमध्ये आज झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकीत शिवसेनेची सत्ता स्थापन झाली आहे. माणगांव विकास आघाडीच्या निवडुन आलेल्या नऊ उमेदवारांची मत ठाम राहिली, ज्ञानदेव पवार यांना नऊ तर राष्ट्रवादीचे आनंद यादव यांना शुन्य तर राष्ट्रवादीच्याच रिया उभारे यांना आठ मते मिळाली. हे मतदान हात वर करुन घेण्यात आले. राष्ट्रवादी व शेकाप आघाडीची आठ मत ठाम राहिली पण ती मत ठरल्या प्रमाणे नगरसेवक रिया उभारे यांना मिळाली. मतदान प्रक्रियेचा कार्यक्रम रायगड जिल्हाधिकारी डाॅ. महेंद्र कल्याणकर यांचे आदेशानुसार दिलेल्या वेळेत पार पडला.

उपजिल्हाधिकारी भूसंपादन काळ प्रकल्प माणगांव तथा निवडणुक पिठासीन अधिकारी नितीन राऊत व नगरपंचायत मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या मार्गदर्शनात नगरपंचायत कर्मचारी रामदास पवार, मंगेश पाटील यांनी काम पाहिले. व कोव्हिड प्रतिबंधक नियम पाळीत कार्यक्रम शांततेत पार पडला.  नगराध्यक्ष पदी ज्ञानदेव पोवार आणि उपनगराध्यक्ष सचिन बोंबले यांची निवड झाली आहे. पोलीसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. कार्यक्रम पार पडताच प्रथम राष्ट्रवादीचे उमेदवार नगर पंचायत कार्यालयातुन बाहेर पडले. यावेळी शिवसैनिकांनी संयमानेच घोषणाबाजी केली, परंतु त्यानंतर मात्र विजयी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष बाहेर पडताच शिवसैनिकांच्या जल्लोषपूर्ण जोरदार घोषणाबाजीत भगवा फडकावीत वातावरण दुमदुमले.

यानंतर उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई व महाड पोलादपूरचे लोकप्रीय आमदार भरत गोगावले यांनी माणगांव नगर पंचायत पटांगणामध्ये येत विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. माणगांव नगर पंचायती मध्ये निधीची कमतरता पडणार नाही. चुकीच्या प्रवृत्तीमुळे गेलेला सव्वा कोटीचा निधीच काय, माणगांव-करांना सव्वाशे कोटीची भरपाई  करुन देणार! आमचे तिन कॅबिनेट मंत्री आहेत शिक्षणमंत्री नामदार उदय सामंत, आपले लाडके नगरविकासमंत्री नामदार एकनाथ शिंदे व आज इथे उपस्थित उद्योगमंत्री आदरणिय नामदार सुभाष देसाई यांच्या माध्यमातून माणगांवचा विकास आता दूर नाही. असे आमदार भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यानंतर नामदार सुभाष देसाई यांनी ही माणगांवकरांचे धन्यवाद मानले, व मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनीही आपल्याला शुभेच्छा दिल्या असल्याचे सांगत, आपण संधी दिलीत ती वाया जाऊ देणार नाही. लोकांची सेवा करा, असा सल्लाच त्यांनी उपस्थित नगरसेवक व शिवसैनिकांना दिला आहे.

नगराध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच ज्ञानदेव पोवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला व लोकनेते अशोकदादा साबळे यांची आठवण काढीत, आज खऱ्या अर्थाने अशोकदादांची स्वप्नपूर्ति झाली ! असे म्हणत माणगांवकरांचे आभार व्यक्त केले. या विजयाचे शिल्पकार शांत संयमी विनयशील ॲड. राजिव साबळे यांनी आमची आघाडी ठाम राहिली आमचे जवळ पूर्ण बहुमत आहे. व विरोधक ही ठाम राहिले. सन्माननिय तटकरे साहेब जादूची कांडी फिरवतील अशा वावड्या उठत होत्या परंतु लोकांना विकास हवा आहे, अनेक कामे अर्धवट राहिली आहेत. यासाठीच परिवर्तन हवे होते, ते घडले आहे. यातुनच त्यांनी शिकावे आणि अजुनही सुधारणा करावी असे आपले मत व्यक्त केले. असंख्य शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यासाठी भगवे झेंडे घेऊन उपस्थित होते. यानंतर गुलाल उधळत एकमेकाची गळाभेट घेत, नाचत, जल्लोष करीत माणगांवात विजयी उमेदवारांची मिरवणुक काढण्यात आली.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies